

Political uncertainty continues as Zilla Parishad election announcement awaited in Maharashtra.
Sakal
नागपूर: ५० टक्क्यांवर आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे सध्या तरी नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मुहूर्त मिळेल की नाही, यावर शंका आहे. मात्र, ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या १२ जिल्हा परिषदा असून तिथे निवडणूक घेण्यास काहीही अडचण दिसून येत नाही.