esakal | चैन लेने ना देगा, सजन तुमकारे आय हाय, मेरा झुमका रे! रंगीबेरंगी भारी झुमक्यांची क्रेझ
sakal

बोलून बातमी शोधा

zumaka

ट्रॅडिशनल ड्रेस घातला असेल तर त्यावर खास झुमके घातले जातात. सध्या भारी वजनाचे, लांब आणि रंगबिरंगी झुमके तरुणींच्या अधिक पसंतीस उतरत आहे.

चैन लेने ना देगा, सजन तुमकारे आय हाय, मेरा झुमका रे! रंगीबेरंगी भारी झुमक्यांची क्रेझ

sakal_logo
By
मनिषा मोहोड

नागपूर : सध्याच्या फॅशनच्या युगात टिकून राहायचे असेल तर भन्नाट स्टाइल केल्याच पाहिजेत. यासाठी महिला व तरुणी कपड्यांमध्ये विविधता आणून स्टाईलिश राहण्याचा प्रयत्न करीत असतात. उठून दिसण्यासाठी जरा हटके स्टाईल करणे तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे कपड्यांची फॅशन करताना एक्सेसरीजकडे देखील तितकेच लक्ष दिले जाते. ट्रॅडिशनल ड्रेस घातला असेल तर त्यावर खास झुमके घातले जातात. सध्या भारी वजनाचे, लांब आणि रंगबिरंगी झुमके तरुणींच्या अधिक पसंतीस उतरत आहे.

हिट ट्रेडिशनल लूकसाठी महिला झुमके पसंत करतात. मोती, खडे, कुंदन ते अगदी सोन्याच्या झुमक्यांची मागणी वाढतच आहे. लांबलचक इअररिंग्जच्या फॅशननंतर सध्या ‘काश्मिरी झुमक्यां' चा ट्रेंड इन आहे. त्यामुळे झुमके फॉर्मात आले आहेत. साडीवर आणि ड्रेसवर शोभून दिसणारा कळीदार झुमका सध्या ट्रेंडमध्ये आहे. हा झुमका वजनाला जड असला, तरी चांगला लुक देतो. सध्या झुमक्‍याच्या बदलत चाललेल्या डिझाइन्स वेस्टर्न कपड्यांवरही उठावदार वाटतात. झुमक्‍यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही फक्त लांब झुमका घातल्यास कोणताही दुसरा दागिना घालायची गरजही नसते. बारीक नक्षी आणि पारंपरिकतेमुळे झुमक्‍याला जगभरातून मागणी आहे. विशेषतः गणपती, मोरपीस, कुयरी या डिझाईन्सला खूप मागणी आहे.

हटके लूकसाठी पार्टी वेअर झुमके
लडीमुळे झुमके अधिक उठावदार वाटतात. ट्रेडिशनल लूक देणारे हे झुमके सलवार कुर्त्यावर, तर साधी, बारीक मोत्यांची लडी असलेल, खडे असलेले झुमके, भरजरी साडीवर आकर्षक दिसतात. इतकेच नव्हे तर नऊवारी, नारायणपेठ, पैठणी अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन साड्यांवरही झुमके शोभून दिसतात. उलट त्यामुळे मस्त ट्रेंडी- ट्रेडिशनल असा लूक येतो. हे झुमके रोज वापरता येत नसले तरी पार्टी, कॉलेज डे किंवा फंक्शनसाठी घालता येतात.

कलरफुल झुमक्यांना पसंती
सध्या गडद रंगाच्या झुमक्यांना जास्त मागणी आहे. लाल, मरून, मोरपंखी, जांभळा अशा रंगांतील खडे किंवा पांढऱ्या मोत्यांचा वापर झुमक्यांमध्ये केला जातो. विविध आकार किंवा नक्षी असलेले झुमके सध्या जास्त लोकप्रिय आहेत. मॅचिंग, काँट्रास्ट, मल्टीकलर स्टोन्स, कुंदनवर्क असलेले झुमकेही पसंतीस उतरत आहेत.

सविस्तर वाचा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी

पारंपरिक आणि बजेटमध्येही
कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींना पारंपरिक दागिने तेही बजेटमध्ये मिळाले तर त्या अजूनच हटके लूकमध्ये येतात. झुमके खिशाला परवडणाऱ्या किंमतीत म्हणजेच ७० ते २२० रुपयांत मिळतात. खडे वापरून बनवलेले झुमके तीनशे ते आठशे रुपयांपर्यंत आहेत. नेहमीच्या कानातल्यांपेक्षा व्यक्तिमत्त्वाला काश्मिरी झुमक्यांमुळे वेगळा लूक मिळतो. त्यामुळे हा काश्मिरी पॅटर्न तरुणी खास ट्राय करून बघतात.

संपादन - स्वाती हुद्दार