

Bhagimahari Lake Drowning
sakal
पारशिवनी : भागीमहारी तलावात रील बनविण्याच्या नादात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संकल्प मालवे (वय १९, चंद्रपूर) आणि अविनाश आनंद(वय२२, मुळचा बिहार व हल्ली मुक्काम नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.