Shegaon Mystery : केसगळतीनंतर आता नखगळतीचा धक्कादायक प्रकार; ३० रुग्ण आढळले, सर्वत्र खळबळ, आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू
Nail Shedding : शेगाव तालुक्यात केसगळतीच्या प्रकरणानंतर आता नखगळतीच्या घटना समोर आल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत ३० रुग्ण सापडले असून आरोग्य विभाग तपासणी करत आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शेगाव : गेल्या जानेवारी महिन्यात राज्यभर खळबळ उडून गेलेल्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणानंतर आता केस गळती झालेल्या पाच गावांत नखं गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.