esakal | मृतदेह एकाचा अन् दुसऱ्याच्याच नावाची पट्टी, कुटुंबीयांना मनःस्ताप

बोलून बातमी शोधा

dead
मृतदेह एकाचा अन् दुसऱ्याच्याच नावाची पट्टी, कुटुंबीयांना मनःस्ताप
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : कोविडबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नावावर लागलेल्या चुकीच्या नावाच्या पट्टीने एकच खळबळ उडविली. त्यावेळी शवगृहात असलेल्या मृतदेहांचे पॅकिंग उघडल्यानंतर मृताची ओळख पटली आणि गोंधळ थांबला. या प्रकाराने मृताच्या नातलगांमध्ये संताप व्यक्त झाला. ही घटना गुरुवारी घडली.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

कोविडच्या संसर्गामुळे एका महिलेला आठ दिवसांपूर्वी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना सकाळी तिच्या अंत्यसंस्काराच्या अनुषंगाने कळविण्यात आले. कुटुंबीयांनी अंत्यदर्शनासाठी धाव घेतली. पण, त्यावेळी महिलेचा मृतदेह सापडत नसल्याचे आढळले. जवळपास तीन ते चार तास सगळेच तणावात राहिलेत. अखेर शवगृहातील मृतदेहांचे पॅकिंग उघडून पाहण्यात आले. पॅकिंग उघडल्यानंतर मृत महिलेची ओळख पटली. मृत महिलेच्या पॅकिंगवर दुसरेच नाव लिहिलेले आढळून आले. त्यामुळे कुटुंबयांना मात्र नाहक त्रास झाला. या प्रकाराने सामान्य रुग्णालयाच्या कारभाराबाबत रोष व्यक्त होत होता. याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता, रात्रीच्या सुमारास पट्टी लावताना ही चूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले.