मानवतेचा संदेश देणारा मार्ग "परमात्मा एक' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

बाबा हनुमानजी व बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेला वंदन केले. संपूर्ण आश्रमाची पाहणी केली. यावेळी परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष राजू मदनकर उपस्थित होते. 

मौदा, (जि. नागपूर) :  "परमात्मा एक सेवक' हा संप्रदाय समाजाला चांगला संदेश देणारा आहे. बरेच लोकांचे व्यसन सुटले, अनेक घरे उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचली. मानवतेला एकत्र जोडणारा मार्ग महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिला आहे. या आश्रमाला भेट देऊन मन प्रसन्न झाले असून ज्या सेवेमुळे लाखो लोक एकत्र येतात ते स्थान येत्या काळात मोठे प्रेरणास्थान राहील, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

पटोले यांनी बुधवारी मौदा येथील परमपूज्य परमात्मा एक सेवक आश्रमाला भेट दिली. त्यांनी बाबा हनुमानजी व बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेला वंदन केले. संपूर्ण आश्रमाची पाहणी केली. यावेळी परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष राजू मदनकर उपस्थित होते. 

मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार

दरवर्षी 26 जानेवारीला होणाऱ्या सेवक संमेलनाबद्दल माहिती दिली. यात दरवर्षी सुमारे 10 लाख सेवक महाराष्ट्रासह संपूर्ण देशातू हजेरी लावतात. भविष्यात आश्रमाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या कामांचीही माहिती पटोले यांनी जाणून घेतली. मदनकर यांनी सांगितले की, भाविकांना राहण्याची, भोजनाची व पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. शेगाव संस्थानच्या धरतीवर विकास केला जाणार आहे, अशी माहिती दिली. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी येथे मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहे. 

आश्रमाचे वास्तू शिल्पकार स्वप्नील चौधरी यांनी पटोले यांना वास्तूबद्दल सांगितले. यावेळी मनोहर देशमुख, मोरेश्वर गभणे, बालाजी नंदनकर, सुखदेव लांजेवार, संजय महाकाळकर, खुशाल जगनाडे, कैलास लांजेवार, पांडुरंग शेंडे, तहसीलदार प्रशांत सांगडे, टी.एन. नंदेश्वर, तापेश्वर वैद्य, शैलेश रोशनखेडे, पुरुषोत्तम डोरले, डिगाबर ठोंबरे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nara Patole Visit Mauda Ashram