esakal | नवनीत राणा यांचा २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश; आशिया पोस्ट फेम इंडियाचा सर्व्हे
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana among 25 best MPs

खासदार नवनीत रवी राणा यांच्या आक्रमक पवित्र्याची सभागृहासोबत, विविध प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे यांनी दखल घेतली व अल्पावधीतच त्यांची ओळख एक सक्षम खासदार म्हणून देशात निर्माण झाली आहे.

नवनीत राणा यांचा २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश; आशिया पोस्ट फेम इंडियाचा सर्व्हे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : फेम इंडिया मासिक व आशिया पोस्ट सर्व्हेक्षणात भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या सर्व्हेक्षणसाठी देशभरातील विविध प्रदेशातून सल्ला घेण्यात आला. महिला सशक्तीकरण, फेम इंडिया मासिक, आशिया पोस्ट, सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा, प्रतिमा, उद्देश, प्रयत्न अशा १० निकषावर नामनिर्देशन पाहण्यात आले. यात अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांचा देशातील २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांच्या खासदारकीला आता १८ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. खासदार नवनीत रवी राणा यांच्या आक्रमक पवित्र्याची सभागृहासोबत, विविध प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे यांनी दखल घेतली व अल्पावधीतच त्यांची ओळख एक सक्षम खासदार म्हणून देशात निर्माण झाली आहे.

अधिक वाचा - महिलादिनीच संतापजनक प्रकार!  नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरनं केला नर्सवर बलात्कार

महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती व नावीन्यपूर्ण विकासाचा अजेंडा घेऊन त्या धडाक्याने कार्यरत आहे. मतदारांशी आत्मीयतेने सुसंवाद साधण्याची त्यांची हातोटी, मतदारांशी सहज सुलभ संपर्क या बाबीमुळे त्या लोकप्रिय आहेत. पती आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात त्यांनी राबविलेले अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रमामुळे त्यांचे नाव सर्वदूर गाजत आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन आशिया पोस्ट व फेम इंडिया यांनी केलेल्या सर्वेमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशातील पहिल्या २५ श्रेष्ठ खासदारांच्या यादीत त्यांना समाविष्ट करण्यात येऊन हा बहुमान देण्यात आलेला आहे.

त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, ३३ सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने महासचिव उमेश ढोणे, संजय हेडाऊ, डॉक्टर दीपक केदार, प्रा. बी. के. हेडाऊ, मीरा कोलटेके, वंदना जामणेकर, गोपाळभाऊ ढोणे, गजानन सूर्यवंशी,आदींनी खासदार राणा यांचे अभिनंदन केले आहे. विशेषत: राणा यांनी महामहीम राज्यपालांचे कडे या जमातींच्या संदर्भात बैठक घेतली होती. राष्ट्रपती यांच्याकडे सुध्दा मिटिंग घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

भरपूर कामे करण्याची इच्छा

मागील नऊ वर्षांपासून राजकीय कामाला सुरुवात केलेल्या नवनीत राणा यांनी खासदार होऊन १८ महिने लोटली आहेत. नवनीत राणा यांनी भरपूर कामे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकांच्या समस्या सोडवायला जेमतेम सुरुवात केल्याने लोकांना प्रचलित झाल्याचे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले.

जाणून घ्या - मध्यरात्रीनंतर अचानक गायब झालेली मुलगी सापडली प्रियकराच्या घरात; आई-वडिलांनी उचललं कठोर पाऊल

हा गौरव माझा नसून शिलेदारांचा
हा गौरव माझा नसून मला निवडून देणाऱ्या तमाम मतदारांचा व माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे पती आमदार रवी राणा तसेच स्वाभिमानी शिलेदारांचा आहे.
- नवनीत रवी, खासदार

loading image