esakal | रवी आणि नवनीत राणा लाटताहेत फुकटचं श्रेय; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet rana and Ravi Rana wants credit said Shivsena Leader in Amravati

जिल्हाप्रमुख सुनील खराटे व महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी पत्रपरिषदेत सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून मॅग्नेटीक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत 1 लाख कोटींचे उद्योग राज्यात आणण्यात आले आहेत.

रवी आणि नवनीत राणा लाटताहेत फुकटचं श्रेय; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारातून अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये सुरू होत असलेल्या औषधी निर्माण कंपनीला अमरावतीत आणण्याचे फुकटचे श्रेय राणा दांपत्य लाटत आहेत, असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

क्लिक करा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं उघडला बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन 

शनिवारी (ता.2) जिल्हाप्रमुख सुनील खराटे व महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी पत्रपरिषदेत सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून मॅग्नेटीक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत 1 लाख कोटींचे उद्योग राज्यात आणण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नांदगावपेठ एमआयडीसीत आंतरराष्ट्रीय हरमन फिनोकेम लिमिटेड या औषधी कंपनीला आपला प्रोजोकेट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हा उद्योग आपणच आणल्याचा खोटा दावा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा करीत आहेत. वास्तविक त्यांचा या प्रकल्पाशी दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. 

या उद्योगाला जमीन हस्तांतरणास मंजूरी प्रदान करताक्षणी राणा दांपत्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतच एमआयडीसीतील काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भुमिपूजन सुद्धा आटोपले, मात्र ही त्यांची नौटंकी असल्याचा आरोप पराग गुडधे यांनी केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशान्वये सदर कंपनीला 200 एकर क्षेत्र हस्तांतरित करण्यात आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा सुद्धा यामध्ये पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे, असे असताना राणा दांपत्याने खोटे श्रेय लुटण्याचा प्रयत्न चालविला आहे. वास्तविक खासदार राणा यांनी आजवर एकही नवीन रेल्वे अमरावतीवरून सुरू केलेली नाही, चिखलदऱ्यातील सीडकोची कामे बंद करण्यात तसेच स्कायवॉकचे काम अडविण्यात राणा दांपत्याचा पुढाकार दिसून येत असल्याचा आरोप सुनील खराटे यांनी केला. पत्रपरिषदेला प्रा. प्रशांत वानखडे, नितीन हटवार, पंजाबराव तायवाडे, विकास शेळके आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जाणून घ्या - रामदेव बाबा गेले, अंबानी अडचणीत; मिहान, एमआयडीसीत उद्योजकांचा थंड प्रतिसाद

या मुद्यावर श्रेय लाटण्याचा कुठलाही प्रश्‍न नाही. शिवसैनिकांचा अभ्यास नाही. हा प्रकल्प केव्हा मंजूर करण्यात आला आणि त्यामध्ये आमची भूमिका काय होती? हे स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे. जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योगांना आडकाठी आणल्यास मी शांत राहणार नाही.
- नवनीत राणा,
खासदार.

संपादन - अथर्व महांकाळ