नवनीत राणांचा संताप अनावर होतो तेव्हा...

navneet rana
navneet rana

अमरावती : अलाहाबाद बॅंकेच्या अनागोंदी कारभारामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. नवनीत राणा मेळघाटमधील चुर्णी गावात गेल्या असताना, तिथले बॅंक कर्मचारी ग्राहकांना त्रास देतात. हे नवनीत राणांच्या लक्षात आले. इथल्या आदिवासी जनतेची छोटी छोटी कामेही हे बॅंकेचे लोक अडवून ठेवतात. हे नवनीत राणांनी डोळ्याने पाहिले. आणि त्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. योग्य उत्तर मिळेपर्यंत इथेच धरणे देणार असल्याचेही त्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांना सांगितले.

बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात, अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. या तक्रारींबाबत माहिती घेण्यासाठी नवनीत राणा स्वत: मेळघाटमधील चुर्णी गावातील बॅंकेत पोहचल्या, तेव्हा ग्राहकांनी त्यांना बॅंकेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली.

चुर्णी गावाच्या दौऱ्यावर असताना अलाहाबाद बॅंकेच्या शाखेबाहेर लागलेली लोकांची रांग पाहून नवनीत राणा थांबल्या. त्यांनी लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी खात्यातील जमा रकमेची माहिती घ्यायची असल्यास बॅंक कर्मचारी दिरंगाई करतात, बॅंकेतून एक हजार रुपये काढायचे असल्यास चार दिवस बॅंकेच्या चकरा माराव्या लागतात, अशी माहिती उपस्थित ग्राहकांनी नवनीत राणा यांना दिली. बॅंकेची सेवा ही ग्राहकांच्या सोयीसाठी आहे की अडवणुकीसाठी? असा प्रश्‍न पडावा, इतकी अडवणुक इथले कर्मचारी करीत असतात हे नवनीत राणांच्या लक्षात आले.
बॅंक फोडून टाकेन
नवनीत राणा यांनी यासंदर्भात बॅंक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनाही बॅंक कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नवनीत राणा यांना राग अनावर झाला. पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते. तोपर्यंत योग्य उत्तर मिळालं नाही, तर बॅंक फोडून टाकेन, असा दमही त्यांनी दिला. शेवटी पाच वाजता बॅंकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर नवनीत राणा तिथून निघाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com