esakal | नवनीत राणा यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढील महिन्यात?
sakal

बोलून बातमी शोधा

mp navneet rana statement on sachin waze case in amravati

नवनीत राणा यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढील महिन्यात?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जातप्रमाणपत्राच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. २) ही सुनावणी होणार होती. आता १ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राच्या मुद्यावर माजी खासदार व शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी गुरुवारी (ता. २) होणार होती. मात्र, ती आता पुढे गेली आहे.

हेही वाचा: का वाढतोय हृदयविकार? खाद्यतेल हेही एक कारण!

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. ही निवडणूक त्यांनी जिंकली. त्यांनी यावेळी दाखल केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करीत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात नवनीत राणा यांच्या विरोधात निकाल लागल्याने निकालाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

loading image
go to top