esakal | का वाढतोय हृदयविकार? खाद्यतेल हेही एक कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

Heart-Attack

का वाढतोय हृदयविकार? खाद्यतेल हेही एक कारण!

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : हृदयविकाराचे प्रमाण हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळते, असा एक समज झाला आहे. परंतु, पुरुषांच्या तुलनेत १० वर्षे उशिरा महिलांना हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार होतो. त्याचे स्वरूप मात्र अधिक गंभीर असते. हृदयविकाराचा झटका आलेल्या अनेक महिलांना याबाबत माहितीच नसते. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने पुन्हा हा मुद्दा येरणीवर आला आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्याला मृत्यूने कवटाळे...

जागतिक स्तरावरील एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये हृदयविकाराची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. हृदयविकार होण्याची अनेक कारणे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. परंतु, अतिताणतणाव, धुम्रपान, अयोग्य जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, वाढत वय आणि लठ्ठपणा आदी कारणांमुळे हृदयविकार होतात. याशिवाय, बऱ्याचदा आनुवंशिकता हे सुद्धा एक कारण आहे.

हेही वाचा: शाळेत टाकले म्हणून डोकं फोडणारी अंध सुरेखा झाली लिपिक

आपण रोज वापरत असलेले पॅकबंद किंवा डबाबंद खाद्यतेल हेही हृदयविकाराचे एक कारण आहे. अगदी नामांकित कंपन्यांचा खाद्यतेलाचा वापर आहारामध्ये असला तरीसुद्धा हृदयविकाराचा धोका निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. मलेशियातल्या पामोलन या खाद्यतेलाची सर्वांत जास्त प्रमाणात आयात केली जाते. भारतामध्ये काही तेल कंपन्या लाखो-करोडो लीटर पामतेल दर महिन्याला आयात करीत असते. खाद्यतेलात हे पामतेल मोठ्या प्रमाणावर मिसळले जाते. जगातील कोणताही देश पामतेलाचा खाण्यासाठी उपयोग करीत नाही. कारण, पामतेल प्रामुख्याने वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये वापरले जाते.

पूर्वीच्या काळात भारतामध्ये मोहरी, तीळ किंवा खोबरेल तेलाचे उत्पादन चांगले होत असल्याने याचा वापर स्वयंपाकात केला जात होता. हे तेल नैसर्गिक असल्याने लोकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. पामतेलामध्ये ट्रान्सफॅट्स नावाचा एक घटक असतो. या घटकामध्ये एक प्रकारची चरबी असते. ही चरबी कोणत्याही तापमानाला विरघळत नाही. ट्रान्सफॅट्स शरीरामध्ये साठत राहतात. हळूहळू शरीरातील धमण्यामध्ये किंवा रक्त वाहिन्यांमध्ये आणि शरीराच्या इतर भागांमध्ये ही चरबी मोठ्या प्रमाणावर साठते आणि अशावेळी मग हार्टअटॅक येतो.

हेही वाचा: आरोग्यासाठी नागरिकांनी केले मुंडण; ओव्हरलोड वाहतुकीमुळे त्रस्त

हृदयविकाराची प्रमुख कारणे

 • व्यायामाचा अभाव

 • अतिताणतणाव

 • धूम्रपान व मद्यपानाची सवय

 • लठ्ठपणा

 • अयोग्य जीवनशैली

 • पौष्टिक आहाराचा अभाव

हृदयविकार टाळण्यासाठी हे करा

 • धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन टाळा

 • सायकलिंग, चालणे, पळणे, पोहणे, अँरोबिक व्यायाम, ट्रेडिमिल आणि नियमित जॉगिंग करा

 • शारीरिक व्यायाम केल्याने शरीराला ऑक्सिजन योग्यप्रमाणात मिळण्यास मदत होते

 • लठ्ठपणा टाळण्यासाठी विविध उपाय करा

 • शाकाहारी, नट्स, बियाणे खा

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top