esakal | मुंबई ही तुंबई होऊ नये; ‘माझी मुंबई, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्यांचा अनागोंदी कारभार
sakal

बोलून बातमी शोधा

mp navneet rana statement on sachin waze case in amravati

‘माझी मुंबई, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्यांचा अनागोंदी कारभार

sakal_logo
By
अरुण जोशी

अमरावती : राणा दाम्पत्य उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता नवनीत राणा यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करून पुन्हा खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माझी मुंबई, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराचा अनागोंदी कारभार पावसाने पुन्हा चव्हाट्यावर आणल्याची टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. (Navneet-Rana-Uddhav-Thackeray-Mumbai-Rain-News-Allegations-against-the-government-nad86)

मुंबई महानगरपालिका बुडाली पाण्यात. ठाकरेंची तिसरी पिढी असफल. मनपाचे पावसाळापूर्वी नियोजनाचे तीनतेरा. माझी मुंबई, माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे मुंबईकरांना नाहक त्रास होत आहे. मुंबईतील भूमिगत गटारे, नदी स्वच्छता आणि रस्त्यांच्या कामांसाठी दरवर्षी अरबो रुपये खर्च करूनही पुन्हा मुंबई तुंबली. महानगरपालिकेच्या नियोजनाचे पार तीनतेरा वाजले, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

केंद्र सरकारने संसदीय समिती स्थापन करून मुंबई महानगरपालिकेच्या अवाजवी खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे म्हणजे यातील उधळपट्टी व नेमके लाभार्थी कोण? हे बाहेर येईल. महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीचे अर्थसंकल्पीय बजेट असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या या अनागोंदी कारभाराला शिवसेनाच जबाबदार असून ठाकरेची तिसरी पिढी सुद्धा मुंबईकरांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.

देशभरात मुंबईची बदनामी

देशभरात मुंबईची होणारी बदनामी व मुंबई महानगरपालिकेच्या खराब प्रतिमेबद्दल अति दुःख होत आहे. मुंबई ही तुंबई होऊ नये म्हणूण केंद्रीय स्तरावर प्रयत्न करू, असेही खासदार नवनीत रवी राणा यांनी म्हटले आहे.

(Navneet-Rana-Uddhav-Thackeray-Mumbai-Rain-News-Allegations-against-the-government-nad86)

loading image