Naxal Firing : गडचिरोलीत नक्षल चकमक; सी-६० पथकावर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naxal Flint

गडचिरोलीत नक्षल चकमक; सी-६० पथकावर गोळीबार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाल्याची माहिती आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवीत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. चकमकीत अद्याप तरी कुणीही जखमी किंवा मृत्यू झाल्याची बातमी नाही. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

loading image
go to top