नक्षल्यांना वाटले तो आहे पोलिस खबऱ्या आणि...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

मृत मुन्शी ताडो हा शुक्रवारी (ता. 10 ) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गावापासून 1 किमी अंतरावरील शेतात काम करीत होता. यावेळी नक्षलवादी त्याला शेतातूनच घेऊन गेले. यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

आलापल्ली (जि. गडचिरोली) : पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून एका 28 वर्षीय युवकाची नक्षल्यांनी हत्या केल्याची घटना शनिवारी भामरागडपासून 18 किमी अंतरावर उघडकीस आली आहे.
मुन्शी देवू ताडो (वय 28) रा. भटपार ता. भामरागड असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो विवाहीत आहे. त्याच्या मागे पत्नी आणि 3 मुली असा परीवार आहे.
मृत मुन्शी ताडो हा शुक्रवारी (ता. 10 ) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गावापासून 1 किमी अंतरावरील शेतात काम करीत होता. यावेळी नक्षलवादी त्याला शेतातूनच घेऊन गेले. यानंतर त्याची हत्या करण्यात आली.
 वाचा - मूल तालुक्‍यात का रखडले घरकुलांचे अनुदान...हे आहे कारण...वाचा सविस्तर

मृत मुन्शी हा एसपीओ (विशेष पोलिस अधिकारी) म्हणून पोलिसांना नक्षल्यांबद्दल माहिती देत होता. यामुळे त्याची हत्या केल्याचे नक्षल्यांनी एका पत्रकात नमुद केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  

संपादन - स्वाती हुद्दार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxali killed youth farmer in Gadchiroli district

Tags
टॉपिकस
Topic Tags: