गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापनदिनीच झाला असता मोठा घातपात! मात्र

मिलिंद उमरे
Wednesday, 26 August 2020

नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या दोलंदा जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दलाचे सी-६० पथकाचे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी अचानक पोलिस जवानांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.

गडचिरोली :  गडचिरोली जिल्हा म्हणजे नक्षली कारवायांचे केंद्रच. इथली नक्षली चळवळ थांबावी यासाठी पोलिस सतत प्रयत्नरत असतात. जीवावर उदार होऊन कार्य करीत असतात. नक्षल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आनेक योजनाही राबविते. तरीही अजूनही नक्षली कारवाया थांबविण्यास पुरेसे यश आलेले नाही.

गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापनदिनीच बुधवारी (ता. २६) दुपारी २. ३० ते ३ वाजतादरम्यान जारावंडी उप पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दोलंदा येथील जंगल परिसरात झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत पोलिस दलाच्या सी- ६० कमांडोंनी एका महिला नक्षलवाद्याचा खात्मा करीत घातपाताच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले.

नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या दोलंदा जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दलाचे सी-६० पथकाचे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी अचानक पोलिस जवानांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.

सविस्तर वाचा - काय म्हणता? आठ महिलांशी लग्न करणारा लखोबा लोखंडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले. या शोध मोहिमेत एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. शोध अभियानादरम्यान घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य मिळाले. या यशाबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सी - ६० कमांडोजचे अभिनंदन केले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalite woman killed by police