
राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी अचानक मोठा स्फोट झाल्याने किचनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमक दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान आग लागताच शिंगणे यांच्या मानसपुत्राने जीव धोक्यात घालून गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेवेळी शिंगणे कुटुंबीय बाहेरगावी असल्याची माहिती समोर आली आहे.