Sharad Pawar: ‘राष्ट्रवादी’ची आजपासून मंडल यात्रा; शरद पवार दाखवणार हिरवी झेंडी, विदर्भातील ११ जिल्ह्यात फिरणार
Vidarbha Politics: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने ओबीसी हक्कांसाठी विदर्भातील ११ जिल्ह्यांत मंडल यात्रा सुरू होत आहे. या यात्रेला पक्षाध्यक्ष शरद पवार हिरवी झेंडी दाखवणार आहेत.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ओबीसी सेलतर्फे उद्या, शनिवारी (ता.९) क्रांती दिनी राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार हिरवी झेंडी दाखवणार आहेत.