दिलासादायक ः आठ पॉझिटीव्ह दुबार तपासणीनंतर निगेटीव्ह

1-image-Coronavirus-MERS-CoV.jpg
1-image-Coronavirus-MERS-CoV.jpg

अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आठ पॉझिटिव्ह रुग्णांचे सात दिवसांच्या उपचारानंतर घेण्यात आलेल्या दुबार तपासणीचे अहवाल गुरुवारी (ता.16) निगेटीव्ह आले आहेत. यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाचाही समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 36 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आजअखेर 241 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून, जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या मात्र 14 आहे.

यासंदर्भात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दिवसभरात (गेल्या 24 तासांत) 45 जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले.  या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.  आतापर्यंत 389 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 285 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, 241 निगेटिव्ह आहेत. तर 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली. या 14 पॉझिटीव्ह पैकी एकाचा अहवाल येण्याआधीच मृत्यू झाला तर अन्य एकाने आत्महत्या केली असल्याने आता 12 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील आठ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने दुबार तपासणीसाठी पाठवले होते. सात दिवसांच्या उपचारानंतर केलेल्या या तपासणीचे हे अहवाल निगेटीव्ह आल्याने हे रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांत अकोला जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचाही समावेश असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. आता या रुग्णांचे आणखी सात दिवसांनंतर घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या प्रवाश्यांची संख्या 407 असून त्यातील 70 जण गृह अलगीकरणात तर 95 जण संस्थागत अलगीकरणात आहेत. 77 जण विलगीकरणात आहेत. अद्याप 165 जणांचे अलगीकरणाचे 14 दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप 57 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाली आहे. आज दुपारनंतर 66 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याने आता प्रलंबित अहवालांची संख्या 90 झाली आहे.

पुढील निगेटीव्ह अहवालानंतर केले जाणार क्वॉरंटाईन
दुबार चाचणीमध्ये निगेटिव्ह आलेले कोरोना बाधित रुग्ण सध्या आयसोलेशन कक्षातच वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. या रुग्णांचे 24 तासानंतर पुन्हा एकदा स्वॅब घेण्यात येणार आहेत. यामध्ये ते निगेटिव्ह आढळून आले, तर त्यांना 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.

पुन्हा 45 संशयित दाखल
कोरोना बाधित आठ रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले, तर दुसरीकडे गत 24 तासांत 45 नवे संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले आहेत. संदिग्ध रुग्णांची वाढती संख्या देखील चिंतेचा विषय आहे. या सर्वांचे स्वॅब घेण्यात येणार असून, त्यांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

अशी आहे आजची स्थिती
तपासणीसाठी पाठविलेले नमुने-389
प्राप्त अहवाल- 285
पॉझीटिव्ह-12
निगेटीव्ह-241
प्रलंबित-90 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com