esakal | १६ ऑगस्ट १९४२ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती चिमूर स्वातंत्र्य झाल्याची घोषणा, वाचा संघर्ष... (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

The neglected bridge at Chandrapur bears witness to history

लोखंडी पुलावर पोलिस कुमक घेऊन असलेला इंग्रज पोलिस अधिकारी जरासंधाला यमसदनी पाठविले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा खात्मा केलेल्या क्षणाची ग्वाही देणारा हा पूल अखेरची घटका मोजत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पुलाला झाडा झुडपांनी वेढले आहे. १५ आणि १६ ऑगस्टला या पुलाची आठवण होते.

१६ ऑगस्ट १९४२ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती चिमूर स्वातंत्र्य झाल्याची घोषणा, वाचा संघर्ष... (व्हिडिओ)

sakal_logo
By
जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांतीचा लढा सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला आहे. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमूरच्या क्रांतिवीरांच्या प्रभातफेरीवर बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. तसेच लाठीमार झाला होता. त्यामुळे युवक बिथरले आणि इंग्रज अधिकारी लपून बसलेल्या विश्रामगृहाला पेटवून दिले. चिमूरवरून दोन किलोमीटर अंतरावरील वरोरा-चिमूर मार्गावरील लोखंडी पुलावरील धुमचक्रीत जुलमी पोलिस अधिकारी जरासंधाचा क्रातीकारांनी वध केला. मात्र, लढ्याची इतिहासाची ग्वाही देणारा लोखंडी पूल अजूनही दुर्लक्षित आहे. आपले अस्तित्व झाडाझुडपा आडून दाखवून देतोय.

८ ऑगस्ट १९४२ मध्ये महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘चले जावं' असा निर्वाणीचा इशारा दिला होता. इंग्रजी राजवटी विरोधात देशात सर्वत्र जनक्षोभ उसळला होता. चिमूरमध्येही क्रांतीचे लोण पसरले. चिमूरच्या क्रांतीविरांनी इंग्रजी राजवटीला १६ ऑगस्टला उलथवून त्यांचा ध्वज उतरवला. यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून चिमूर स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली होती. क्रांतीविरांनी चिमूर -वरोरा मार्गावर झाडे कापून इंग्रंजाची कुमक गावात येऊ नये म्हणून अडथळे निर्माण केले होते.

अधिक वाचा -  ते मुहूर्त काढत जातील; पण सरकार इंचभरही हलणार नाही, कोणी व्यक्त केला हा विश्वास...

१६ ऑगस्ट १९४२ रोजी युवकांनी प्रभातफेरीचे आयोजन केले होते. या प्रभातफेरीवर तत्कालीन इंग्रज मंडळ अधिकारी डूंगाजी आणि सोनवणे यांच्या आदेशाने गोळीबार आणि लाठीहल्ला करण्यात आला होता. ज्यात क्रांतिवीर शहीद झाले तर काही जखमी झाले. यामुळे युवक व नागरिक बिथरले. त्यांनी सरळ इंग्रज अधिकारी असलेल्या विश्रामगृहावर हल्ला केला. यात झालेल्या दगडफेक व जाळपोळीमध्ये विश्रामगृहासह त्या जुलमी अधिकाऱ्यांना भस्मसात केले.

लोखंडी पुलावर पोलिस कुमक घेऊन असलेला इंग्रज पोलिस अधिकारी जरासंधाला यमसदनी पाठविले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा खात्मा केलेल्या क्षणाची ग्वाही देणारा हा पूल अखेरची घटका मोजत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पुलाला झाडा झुडपांनी वेढले आहे. १५ आणि १६ ऑगस्टला या पुलाची आठवण होते.

तीन दिवस मिळाले होते स्वातंत्र

युवक व नागरिकांनी सरळ इंग्रज अधिकारी असलेल्या विश्रामगृहावर हल्ला केला. यात झालेल्या दगडफेक व जाळपोळीमध्ये विश्रामगृहासह जुलमी अधिकाऱ्यांना भस्मसात केले. चिमूरच्या क्रांतीविरांनी इंग्रजी राजवटीला १६ ऑगस्टला उलथवून त्यांचा ध्वज उतरवला. यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. १६ ते १८ ऑगस्ट १९४२ पर्यंत चिमूर स्वातंत्र्य होते. यानंतर इंग्रजांनी परत ताबा मिळवला होता.

संपादन - नीलेश डाखोरे