काय सांगता? विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी

प्रमोद काकडे
Wednesday, 30 September 2020

नागपूर परिमंडळात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. चंद्रपूर विभागातील चंद्रपूर शहरात सर्वाधिक १,९७९ वीज जोडण्या आहेत. बल्लारपूर विभागात १,८७५, वरोरा विभागात १,५९८, तर, ब्रह्मपुरी विभागात १,२७३ ग्राहकांचा समावेश आहे.

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व व्यवहार बंद होते. मात्र, त्या काळातही महावितरणने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. राज्यभरात तब्बल २ लाख २२ हजार १७१ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. विदर्भातील ७१ हजार ४२५ ग्राहक आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजार ४५२ आणि गडचिरोली जिल्ह्यात चार हजार ८१८ ग्राहकांचा समावेश आहे.

नागपूर परिमंडळात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. चंद्रपूर विभागातील चंद्रपूर शहरात सर्वाधिक १,९७९ वीज जोडण्या आहेत. बल्लारपूर विभागात १,८७५, वरोरा विभागात १,५९८, तर, ब्रह्मपुरी विभागात १,२७३ ग्राहकांचा समावेश आहे. गडचिरीरोली जिल्ह्यात एकूण ४,८१८ वज जोडण्या देण्यात आल्या. त्यात आल्लापल्ली विभागात १,९२६, गडचिरोली विभागात १,६१९ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. लॉकडाउन काळात सर्व खबरदारी घेऊन जीवाची पर्वा न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत वीजपुरवठा सुरळीत ठेवला. त्यासोबतच नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीज जोडणी करून दिली.

राज्यात १ एप्रिल ते २९ सप्टेंबर २०२० या काळात विविध योजनेतून २ लाख २२ हजार १७१ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. विदर्भात नागपूर परिमंडळात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. अकोला परिमंडळ १३,९३७, अमरावती १४,८११, औरंगाबाद १४,३९०, बारामती २४,५३७, भांडूप १८,२५९, चंद्रपूर १०,२७०, गोंदिया ९,८७२, जळगाव १६,६२१, कल्याण ३१,२०५, कोकण ७,५१०, कोल्हापूर २०,२०२, लातूर १५,६६२ आणि नांदेड परिमंडळात २ हजार ३६९ नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली.

सविस्तर वाचा -  बुलेट सायलेन्सरने फटाके फोडाल तर खबरदार; पोलिसांचे तुमच्यावर लक्ष

वीज जोडणीची प्रक्रिया ऑनलाईन
महावितरणकडून नवीन वीज जोडणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांना महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल ऍपद्वारे अर्ज करून नवीन वीज जोडणी घेता येणार आहे.
सुनील देशपांडे,
मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New connections by Mahavitaran all over Vidarbha