किसान सन्मान योजना वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्यांची नोंदणी बंद

किसान सन्मान योजना.j
किसान सन्मान योजना.je sakal

अचलपूर (जि. अमरावती) : शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पंतप्रधानांनी (kisan samman yojana) सुरू केलेली किसान सन्मान योजना सध्या प्रशासकीय वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महसूल विभागाने पूर्णत्वास नेलेल्या योजनेचा पुरस्कार कृषी विभागाला (agriculture department) दिल्याने महसूल व कृषी विभागात वाद उफाळून आला. याच वादातून महसूल विभागाने काम बंद केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, दोन विभागांच्या वादात शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक स्थिती आहे. (new farmers registration closed in kisan samman yojana in amravati)

किसान सन्मान योजना.j
आता प्रदूषण होणार कमी, ‘स्‍मार्ट ट्री’ गिळणार हवेतील धुळ!

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पंतप्रधानांनी किसान सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांना दोन हजार रुपये सन्मान म्हणून देण्यात येतात. मात्र, काही महिन्यांपासून प्रशासकीय वादामुळे या योजनेतील नवीन शेतकऱ्यांची नोंदणी बंद करण्यात आली आहे. योजना सुरुवातीपासून कृषी विभागाऐवजी महसूल विभागाने चालवली होती. मात्र, पुरस्कार देतेवेळी महसूल विभागाला डावलून कृषी विभागाला देण्यात आल्याने महसूल व कृषी विभागात वाद झाला. याच वादातून महसूल विभागाने काम बंद केल्याची माहिती पुढे आली आहे.

अनेक पात्र शेतकरी नोंदणी बंद असल्याने लाभ घेऊ शकत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये दोन्ही विभागांप्रती रोष निर्माण झाला आहे. योजनेचा पात्र शेतकऱ्यांना लाभ घेता यावा, यासाठी शासनाने दोन्ही विभागांतील वाद बाजूला ठेवून नोंदणी सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

किसान सन्मान योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन नोंदणी कृषी विभाग व महसूल विभागाच्या श्रेयवादावरून बंद पडलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांची नवीन नोंदणी तातडीने सुरू करण्यात यावी.
- रवी घाटे, पात्र शेतकरी.
योजनेचे काम आतापर्यंत महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले. योजनेची अंमलबजावणी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. याबाबत कृषी आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी कृषी कार्यालयात पाठवणे चुकीचे आहे.
- प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी.
योजनेच्या कामासंदर्भात प्रशासन आणि संघटनास्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. जो निर्णय प्रशासन व संघटनास्तरावर घेतला जाईल त्यानुसार योजनेचे काम करण्यात येईल.
-मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com