पती व मुलांकडून रोज केल्‍या जातात नव्‍या फर्माइश; ‘पोटपुजे’साठी असे सोडले जातायेत हुकूम

food order in buldana.jpg
food order in buldana.jpg

खामगाव (जि.बुलडाणा) : लॉकडाउन सुरू होऊन आता जवळपास एक महिना होत आहे. सक्‍तीची सुटी असल्‍याने बच्चे कंपनी पतीराजांना बाहेर जाऊन पाणीपुरी, भेळ, समोसा विविध चटपटीत पदार्थांवर ताव मारण्याची संधीच मिळत नसल्‍याने. बहुतांश घरात गृहिणींना रोज वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी हुकूम सोडले जात आहेत. म्‍हणजे दिवस निघला की, जणू आपकी फर्माईश हाच कार्यक्रम सध्या घराघरांमध्ये सुरू आहे. परंतु या सर्वांमध्ये मात्र बारा महिने चोवीस तास लॉकडाउन असलेल्‍या गृहिणींची दमछाक होतांना दिसत आहे.

काेरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्‍या वतीने गेल्‍या 23 तारखेपासून लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. आता या लॉकडाउनला जवळपास एक महिना पूर्ण होत असून  या आधी कधीही अशी परिस्‍थिती उद्‌भवली नसल्‍याने नेहमी बाहेर फिरण्याची, चटपटीत खाण्याची सवय असणाऱ्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. हीच परिस्‍थित मुलांची देखील आहे. यावर्षी परीक्षा न देताच पुढील वर्गात जाण्याचा योग मुलांना आला व एक महिना आधीच सुट्या लागल्‍याचा आनंद त्‍यांच्‍यासाठी गगनात मावेनासा झाला आहे.

सुट्यांमध्ये विविध समर कॅम्‍प तेथे होणारी मजा मस्‍ती, बाहेरचे चटपटीत पदार्थ खाणे हे सर्व तोंडसुख हरवले आहे. तर अनेक घरातील पुरुष देखील कित्‍येक दिवसापासून घरीच असल्‍याने व बाहेरचे काहीच चटपटीत खायला मिळत नसल्‍याने बहुतांश घरी मुले व वडिलांकडून रोज नवनवीन पदार्थांची फर्माईश केल्‍या जात आहे.  एक, दोन दिवस असे नवनवीन पदार्थ बनवायचे असल्‍यास ठिक आहे. 

परंतु, ही बाब नित्‍याचीच झाली असल्‍याने घराघरातील गृहींणी देखील या रोजच्‍या आजकी फर्माईश कार्यक्रमाला कंटाळल्‍या असून कधी एकदाचे हे लॉकडाउन संपते याचा विचार करीत आहेत. कारण हे सर्व करण्यासाठी शारीरिक श्रमाचा सर्व भार महिलांनाच उचलावा लागत आहे. मुलांच्‍या करामतींना पालक कंटाळले तसेच मुले घरातच असल्‍याने त्‍यांच्‍या करामती आणि कारनाम्‍यांना पालकांना सामोरे जावे लागत असल्‍याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महिलांना लॉकडाउन कायमचेच
अवघ्या काही दिवसात आपण आपल्‍याच घराला कंटाळलोय, एरवी जे घर आपले सर्वस्‍व आहे. आज ते घर आपल्‍याला नकोसे झाले आहे. परंतु  प्रत्‍येक घरातील गृहिणी ही विना तक्रार आपले काम करत घरात लॉकडाउन आहे. दिवसभर घरी बसणे किती कठीण आहे. आपल्‍याला आता कळले आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि आपण मोकळा श्‍वास घेतो यासाठी आपण आसुसलो आहोत. परंतु महिलांना असे लॉकडाउन तर कायमचेच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com