esakal | माणसातच दिसला त्यांना देव! युवकांचा सोशल मीडियावर नवा ट्रेंड

बोलून बातमी शोधा

stay

काेणी डाॅक्टर, पाेलिस तर काेणी सफाई कामगार बनले आहे. साेशल मीडिया वर शेअर केलेल्या या पाेस्टमध्ये युवकांनी घरी थांबलेल्या नागरिकांचेही आभार मानले आहेत. हातात बॅनर घेत त्याचे काेलाज बनवून ते सांगली मीडिया वर शेअर करण्यात आले आहे.

माणसातच दिसला त्यांना देव! युवकांचा सोशल मीडियावर नवा ट्रेंड
sakal_logo
By
भूषण काळे

अमरावती : लाॅकडाऊन काळत नेटिझन निरनिराळे ट्रेन्ड चालवित असल्याचे समाजमाध्यमावर बघायला मिळत आहे. असाच एक युनिक ट्रेन्ड सध्या चांगलाच प्रचलित झाला आहे. या ट्रेन्ड मध्ये नेटिझन काेराेनाशी सामना करणा-या प्रशासनाचे कौतुक करताना दिसत आहेत.

यामध्ये काेणी डाॅक्टर, पाेलिस तर काेणी सफाई कामगार बनले आहे. साेशल मीडिया वर शेअर केलेल्या या पाेस्टमध्ये युवकांनी घरी थांबलेल्या नागरिकांचेही आभार मानले आहेत. हातात बॅनर घेत त्याचे काेलाज बनवून ते सांगली मीडिया वर शेअर करण्यात आले आहे.

एका महिन्यापासून  लाॅकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारासोबत वेळ घालवित आहे. दुसरीकडे डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पोलिस प्रशासन, मनपा प्रशासन, पंपचालक, शेतकरी, क्रुषी कर्मचारी आदी यंत्रणा युद्धस्तरावर  कोरोनाशी लढा देत आहेत. अनेकांना नियम तोडल्यामुळे पोलिसांचे फटके सुद्धा खावे लागले. मात्र दुसरीकडे त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. ही सर्व परिस्थिती बघता नेटकऱ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने घरातच राहून काही पोस्टर्सच्या माध्यमातून कोरोना योद्धयांचं कौतुक केलं आहे. ज्यातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - या चिमुकल्यांच्या कुटुंबाची कहाणी देईल तुम्हाला जगण्याचे बळ...एकदा वाचाच

माणूसच माणसासाठी
सगळी देवळं, मस्जिद आणि गुरुद्वारे बंद झालीत. पण वेळेवर माणूसच माणसाच्या कामी आलाय. म्हणजे व्यवस्थेत तरुणाईला देव दिसलाय.या संदेशाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, असे नेटकरी प्रथमेश उमकने सांगितले.