esakal | अंकिता जळीतकांड : मुख्य तपास अधिकाऱ्याची उलट तपासणी सुरू, पुढील सुनावणी ३ मे रोजी

बोलून बातमी शोधा

hearing on ankita burned case in hinganghat of wardha
अंकिता जळीतकांड : मुख्य तपास अधिकाऱ्याची उलट तपासणी सुरू, पुढील सुनावणी ३ मे रोजी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिता पिसुड्‌डे जळीतकांड प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी तृप्ती जाधव यांची बचाव पक्षाकडून उलट तपासणी सुरू झाली. आरोपीचे वकील अ‌ॅड. भूपेंद्र सोने यांनी ही उलटतपासणी घेतली.

हेही वाचा: कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मंगळवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समोर उलट तपासणीने कामकाजाची सुरुवात झाली. कोविड प्रादुर्भावामुळे न्यायालयाची वेळ दुपारी १ वाजेपर्यंत असताना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीशांनी अर्धा तास उशिरापर्यंत कामकाज समोर नेले. याप्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, मुंबई हे प्रत्यक्ष न्यायालय हजर राहू शकले नाही. मात्र, सकाळी ११ वाजेपासून कामकाज संपेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा त्यांनी सहभाग नोंदविला. आजही उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या उलटतपासणीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी ३ व ४ मे २०२१ रोजी ठेवली आहे. या प्रकरणामध्ये स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अ‌ॅड. दीपक वैद्य यांनी सहकार्य केले.