esakal | यवतमाळ ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी नऊ पॉझिटिव्ह, एकाला सुटी 
sakal

बोलून बातमी शोधा

Nine more patients corona positive in Yavatmal district

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तालुकास्तरावर रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे झाले आहे.

यवतमाळ ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी नऊ पॉझिटिव्ह, एकाला सुटी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात गुरुवारी (ता.18) दिवसभरात नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेला एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला सुटी देण्यात आली. नव्याने आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पुसद शहरातील चार, दारव्हा शहरातील चार व नेर येथील एक जणाचा समावेश आहे. त्यात सहा पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. 

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तालुकास्तरावर रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे झाले आहे. गुरुवारी (ता.18) एकाच दिवशी नऊ जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासीयांसाठी ही चिंताजनक बाब मानली जात आहे. पुसद येथील 20, 25, 27 वर्षीय पुरुष व 55वर्षीय महिला, दारव्हा येथील 29 व 54वर्षीय पुरुष, तर नेर येथे 35 व 55वर्षीय महिला तसेच 35वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. 

अधिक वाचा -  नागपुरातील निकालस मंदिर, भोईपुरा परिसरात शिरला कोरोना; मुंढेंनी घेतला हा निर्णय...
 

जिल्ह्यात बुधवारपर्यंत ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 42 होती. गुरुवारी (ता.18) एकाला सुटी मिळाल्याने ही संख्या 41 वर आली. नव्याने नऊ पॉझिटिव्ह वाढल्यामुळे सध्यास्थितीत ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 171 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.

यापैकी नऊ पॉझिटिव्ह, तर 162 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी 14 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत दोन हजार 992 नमुने तपासणीकरिता पाठविले आहेत. त्यापैकी दोन 961 प्राप्त, तर 31 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 207वर पोहोचली आहे. यापैकी 149 जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.