

नागपूर : शिक्षण विभागातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत १९ आरोपींना अटक झाली आहे. यात शिक्षण उपसंचालकांसह शिक्षणाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा संचालकांचा समावेश आहे. आणखीही काही अधिकारी, कर्मचारी तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. यात शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.