नितीन राऊत यांना उत्तरमधूनच फटाके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर,  ः कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांना उत्तर नागपूरमधूनच फटाके लावण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधासाठी सर्व पदाधिकारी एकत्र आले असून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांच्याकडे करण्यात आली. उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसकडे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. उमेदवारी देताना निष्ठा आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता तपासण्यात यावी. एकाच नेत्याची एकाधिकारशाही संपुष्टात आणावी. तसेच ज्यांनी कॉंग्रेसच्या मुलाखत प्रक्रियेत भाग घेतला त्यापैकी कोणालाही तिकीट द्यावे, अशी मागणी उत्तरच्या पदाधिकाऱ्यांनी वासनिक यांच्याकडे केली.

नागपूर,  ः कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांना उत्तर नागपूरमधूनच फटाके लावण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधासाठी सर्व पदाधिकारी एकत्र आले असून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांच्याकडे करण्यात आली. उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसकडे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. उमेदवारी देताना निष्ठा आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता तपासण्यात यावी. एकाच नेत्याची एकाधिकारशाही संपुष्टात आणावी. तसेच ज्यांनी कॉंग्रेसच्या मुलाखत प्रक्रियेत भाग घेतला त्यापैकी कोणालाही तिकीट द्यावे, अशी मागणी उत्तरच्या पदाधिकाऱ्यांनी वासनिक यांच्याकडे केली. यात नगरसेवक मनोज सांगोले, नगरसेवक संदीप सहारे, असंघटित कामगार संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक
त्रिशरण सहारे, धरम पाटील, भावना लोनारे, स्नेहा निकोसे, सुनीता ढोले, बॉबी दहीवले, पंकज लोनारे, विवेक निकोसे, रोहित यादव, संतोष लोनारे, पीयूष लाडे, राज खत्री, पवन सोमकुवर, इरशाद शेख, इरशाद मलिक, सुरूर सिद्दिकी, सूरज आवळे, अमोल लोनारे, बादल वाहने, दीपक जैन, बशीर शेख वामन इंदूरकर, विजय रंगारी, शेख रहीम आदीचा समावेश होता.उत्तर नागपुरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुकुल वासनिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महापालिकेच्या निवडणुकीत राऊत यांनी पक्षाच्याच उमेदवारांच्या विरोधात खुलेआम काम केले. विरोधकांना आर्थिक मदत केली. यामुळे अनेक उमेदवार पराभूत झालेत. लोकसभेच्या निवडणुकीतही ते सक्रिय नव्हते. फक्त नावालाच उपस्थित होते. एकाही सभेत ते सहभागी झाले नाहीत. रामटेक लोकसभेतही कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. उघडपणे त्यांच्या नावाला विरोध दर्शवला. यानंतरही त्यांना प्रदेश कॉंग्रेसने कार्याध्यक्ष केले याबाबत आश्‍चर्य करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Raut