esakal | यंदाही पालखी आणि दिंडीविना होणार नववर्षाची सुरुवात; कोरोनामुळे गुढीपाडव्याचा उत्साह नाहीच

बोलून बातमी शोधा

no celebration of Gudhipadwa marathi new year due to corona

गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा करावा, यासाठी गृहविभागाने काही दिशानिर्देश जनतेला दिले आहे. कोविड-19 च्या लाटेमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा विचार करता व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता गुढीपाडवा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश शासनाने दिले.

यंदाही पालखी आणि दिंडीविना होणार नववर्षाची सुरुवात; कोरोनामुळे गुढीपाडव्याचा उत्साह नाहीच
sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून या सणाकडे पाहिले जाते. परंतु आज साजरा होणाऱ्या गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट असल्याने पालखी व दिंडीविनाच हा सण साजरा करावा लागणार आहे.

कोरोनाच्या मृत्यूछायेतही चैत्रपालवीचा तजेला कायम; ऋतुराज वसंताला साद घालत रानोमाळ कोकीळकूजन

गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा करावा, यासाठी गृहविभागाने काही दिशानिर्देश जनतेला दिले आहे. कोविड-19 च्या लाटेमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा विचार करता व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता गुढीपाडवा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश शासनाने दिले. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर आजपर्यंतचे सार्वजनिक सण, उत्सव लोकांनी एकत्रित न जमता साध्या पद्धतीने साजरे केलेले आहे. 

संसर्गात मागील वर्षीपेक्षा अधिक वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षीचा गुढीपाडवा सण प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत साजरा करणे अपेक्षित आहे. विविध भागांत गुढीपाडवा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करीत नवीन वर्ष साजरा करण्यात येते. यावर्षी पालखी, दिंडी व्यतिरिक्त दुचाकी फेरी, मिरवणुका काढण्याला गृहविभागाने अनुमती दिलेली नाही. 

कोणत्याही सार्वजनिक समारंभाचे आयोजन करू नये, अशी सक्त ताकीद दिली आहे. पाचपेक्षा अधिक लोकांनी न जमता सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरगुती गुढी उभारून हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महानगरपालिका, पोलिस, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

Success Story: हिरव्यागार शेतात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ थांबणार; इंजिनियर्सनी बनवली `इलेक्ट्रिक...

रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान राबवा

गुढीपाडवा सणाच्या दिवशी रक्तदान, आरोग्य तपासणी, मरेरिया, डेंगी आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करावी, असे आवाहनसुद्धा गृहविभागाच्या वतीने करण्यात आले. 

संपादन - अथर्व महांकाळ