esakal | कोलितमारा परिसरात "नो कनेक्‍टीव्हीटी'
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोलितमारा परिसरात "नो कनेक्‍टीव्हीटी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टेकाडी, ता.25 ः केंद्र शासनाने डिजिटल इंडियाचा बिगूल फुकताच शिक्षण विभागानेदेखील शाळा डिजिटल करण्याचे धोरण झपाट्याने हाती घेतले.2017 पर्यंत संपूर्ण शाळाना डिजिटल करण्याचा आदेश जाहीर केला होता. याच शृंखलेत पारशिवनी तालुक्‍यातील कोलितमारा आदिवासीबहुल सर्कलअंतर्गत येणाऱ्या काही शाळा डिजिटल प्रणालीसोबत जोडल्या गेल्या. परंतु, वाढलेले वीजबिल आणि ढासळलेली वायफाय यंत्रणेसोबत मोबाईल कनेक्‍टिव्हीटीचा खोडामुळे डिजिटल केलेल्या शाळांना नाइलाजास्तव गुरुजींच्या "जिओ' भरोसे कसेबसे जगावे लागत आहे.
शाळेची पटसंख्यावाढीसाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढेल, या हेतूने राज्यातील शाळांमध्ये डिजिटल यंत्र बसविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. काही अपवाद वगळता राज्य शासनाकडून हवा तितका निधी उपलब्ध करण्यात आला नसल्याने लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसे गोळा करून शाळांमध्ये डिजिटल संयंत्र खरेदी करण्याच्या निर्देशातून तालुक्‍यातील कोलितमारा सर्कलमध्ये ढवळापूर, सालई, मोकासा, कान्हादेवी, निंबा, अवलेघाट व टेकाडी-कानाझरी या जिल्हा परिषद शाळांना डिजिटल करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. प्रोजेक्‍टर, संगणक, टीव्ही प्रोजेक्‍टर तर कुठे कुठे फक्त टीव्ही हेच माध्यम शिकवण्यासाठी उपलब्ध आहे. परंतु, डिजिटल धोरणातील मुख्य दुवा असलेले "इंटरनेट कनेक्‍टिव्हीटी' वायफाय यंत्रणा ढासळलेली आहे. सोबत विजेचा पुरवठाच उपलब्ध नसेल तर या डिजिटलचा उपयोग होणार तरी कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. येथील शाळेच्या शिक्षकांजवळ मोबाईल आहे, पण ज्यांच्याकडे जिओ आहे, ते वेळ मारून नेतात. बाकीच्यांना नेटवर्क नसल्याने मोबाईल उपयोगाचा नाही. नेटवर्कअभावी डिजिटल शाळा अर्थहीन असल्याचे चित्र आदिवासीबहुल सर्कलमध्ये स्पष्ट दिसत आहे.

loading image
go to top