पाण्यासाठी महिलांचा एल्गार,जलवाहिनी फूटून लाखो लीटर पाणी जाते वाहून!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

सध्या शेतीची कामे सुरू असल्याने वेळेवर पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्याने शेतीवर जाण्यास उशीर होऊन कामास विलंब होत आहे. नळाला पाणी न आल्याने विहिरीवर लहान लहान मुलीसुद्धा पाणी भरण्यासाठी जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी महिलांनी यावेळी केली.

सावली (जि. चंद्रपूर) : संपूर्णजगाला पाण्याची समस्या सतावत सतानाच सावलीत मात्र जलवाहिनी फु टल्याने लाखो लीटर पाणी वाहून जाते आहे. आणि प्रशासनाला त्याचे काहीही गांभीर्य नसल्याचा इथल्या नागरिकांचा आरोप आहे. शेवटी पाण्यासाठी स्थानिक महिलांनी आंदोलन करण्याची वेळ आली.

सावली शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत अस्तित्वात असतानापासूनच जीवन प्राधिकरण योजना व ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. मात्र, मागील तीन महिन्यांपासून या दोन्ही योजना कुचकामी ठरत असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. 2) शहरातील महिलांनी एल्गार पुकारत नगरपंचायतीवर धडक दिली.

सावली शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गात नळाची जलवाहिनी आल्याने अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. शहरातील 13, 14, 15 आणि 19 या प्रभागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी देण्यात आल्या. परंतु, त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले. प्रभागातील विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

सध्या शेतीची कामे सुरू असल्याने वेळेवर पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्याने शेतीवर जाण्यास उशीर होऊन कामास विलंब होत आहे. नळाला पाणी न आल्याने विहिरीवर लहान लहान मुलीसुद्धा पाणी भरण्यासाठी जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी महिलांनी यावेळी केली.

पाणी पुरवठा नियमित व्हावा
नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. त्याचा परिणाम कामावर होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा.
इंदिरा प्रधाने,
सावली

सविस्तर वाचा - आयुक्‍त मुंढेंना आता कोणी दिला इशारा?

नळ योजना पूर्ववत होईल
मुख्य रस्त्याचे बांधकाम सुरू असून, शहरातील जलवाहिनी फुटली आहे. नळाच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. येत्या तीन ते चार दिवसांत नळ योजना पूर्ववत सुरू करण्यात येईल.
मनीषा वजाळे,
मुख्याधिकारी, सावली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No drinking water in Sawali