"त्याच्या' दहशतीमुळे कोणीही शेताकडे जाण्यास धजावेना...

tiger
tiger

वरुड (जि. अमरावती) : गेल्या आठ दिवसांपूर्वी नागझिरी, गोरेगाव परिसरात आढळलेल्या वाघाने आता आपला मोर्चा शेकदरी गव्हाणकुंडकडे वळवला असल्याची शक्‍यता आहे. गव्हाणकुंड परिसरातील शेकदरी शेतशिवारात विष्णू देशमुख यांच्या शेतातील म्हशीची वाघाने शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सद्यःस्थितीत परिसरातील शेतांमध्ये खूरपणीला सुरुवात झाली आहे. मात्र, वाघाच्या दहशतीमुळे कुणीही शेतात जाण्यास धजावत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शेख शब्बीर यांच्याही गायीचा या वाघाने झडप घालून फडशा पाडला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक पायल अंबाडकर यांच्यासह टेंभूरखेडा वनसमितीचे पदाधिकारी तसेच वनपाल डी. एस. नवले, वनमजूर विजय मुंदाणे यांनी घटनास्थळ गाठले. वाघाने जेथे म्हशीची शिकार केली त्या स्थळाचा पंचनामा करण्यात आला. 

दरम्यान, रात्रीच्या सुमारास शेकदरीच्या पायथ्याशी असलेल्या गव्हाणकुंड येथील काही शेतमजुरांना वाघ दिसल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. वाघाच्या शोधात अधिकाऱ्यांनी गव्हाणकुंड येथे धाव घेतली. दहा दिवसांचा कालावधी होत आला तरी वाघ सतत चकमा देत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

कुणीही शेतात जाण्यास धजावेना 

एकीकडे कोरोनाची तर दुसरीकडे वाघाची दहशत असल्याने शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? असा प्रश्‍न सर्वसामान्य शेतकरी आता विचारू लागला आहे. मागील आठ दिवसांपासून तालुक्‍यात वाघाची दहशत असताना त्या वाघाचा शोध लागत नसल्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळले आहे. वनविभागाने त्या वाघाला पकडून शेतकऱ्यांना किमान वाघाच्या दहशतीमधून तरी मुक्त करावे, अशी आशा शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे. 

वाघाचा शोध सुरू 

गव्हाणकुंड परिसर हा जंगलाचाच एक भाग असल्यामुळे या जंगलात वाघ असणारच यात तिळमात्र शंका नाही. मात्र, या वाघाची दहशत थांबविण्यासाठी त्याचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत लांभाडे यांच्या मार्गदर्शनात वाघाच्या शोधात असल्याचे वनरक्षक पायल अंबाडकर यांनी सांगितले. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com