esakal | या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही; आतापर्यंत ३० निगेटीव्ह

बोलून बातमी शोधा

No patient is positive; So far 1 negative

शभरासह राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटीव्ह आढळला नाही. परंतु कोरोना संशयित असलेले तीन रुग्णांना सोमवारी (ता. ३०) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात सर्वोपचार रुग्णालयात भरती झाले. याव्यतिरीक्त प्रयोगशाळेतून अद्याप पाच रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थांच्या (स्वॅब) नमून्यांचे तपासणी अहवाल अप्राप्त आहेत. एकूण आठ रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल मिळाल्यानंतर जिल्ह्यातील स्थिती स्पष्ट होईल.

या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही; आतापर्यंत ३० निगेटीव्ह
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : देशभरासह राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटीव्ह आढळला नाही. परंतु कोरोना संशयित असलेले तीन रुग्णांना सोमवारी (ता. ३०) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात सर्वोपचार रुग्णालयात भरती झाले. याव्यतिरीक्त प्रयोगशाळेतून अद्याप पाच रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थांच्या (स्वॅब) नमून्यांचे तपासणी अहवाल अप्राप्त आहेत. एकूण आठ रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल मिळाल्यानंतर जिल्ह्यातील स्थिती स्पष्ट होईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत विदेशातून आलेल्या नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यसोबतच त्यांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा करण्यात येत आहे.

दरम्यान सोमवारपर्यंत (ता. ३०) विदेशातून १३२ नागरिक जिल्ह्यात दाखल झाले. त्यातील ४५ नागरिक अद्याप गृह अलगीकरणात आहेत, तर ८५ जणांचा गृह अलगीकरणाचा (१४ दिवसांचा) कालावधी पूर्ण झाला आहे. एका रुग्णाला विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला नसला तरी सोमवारी (ता. ३०) तीन नवे रुग्ण रुग्णालयात तपासणीसाठी भरती झाले. त्यासोबतच पाच रुग्णांचे तपासणी अहवाल अद्यापही अप्राप्त आहेत.

अशी आहे कोरोना रुग्णांची स्थिती
नव्याने दाखल रुग्ण - ०३
एकूण भरती रुग्ण - ०५
सुटी देण्यात आलेले रुग्ण - ०२
निगेटीव्ह अहवाल - ३०
पॉझिटीव्ह अहवाल - ००
अप्राप्त अहवाल - ०५
ओपीडीमध्ये झालेली तपासणी - २२४