शेकडो वर्षांची परंपरा खंडित! यंदा ना रावण दहन ना दांडिया; नागरिकांच्या उत्साहात कोरोनाचे विघ्न 

आनंद चलाख /मनोज आत्राम
Wednesday, 14 October 2020

शहरातील पुरातन काळातील भवानी माता मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मागील अनेक वर्षापासून मंदिर परिसरात नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो.

राजुरा (जि. चंद्रपूर) : राजुरा शहरातील भवानी माता मंदिर परिसरात शेकडो वर्षापासून होत असलेले रावण दहन यावर्षी कोविड संकटामुळे प्रथमच रद्द करण्यात आले आहे. शिवाय भवानी माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष माजी आमदार एडवोकेट संजय धोटे यांनी केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकाने शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन केलेले आहे.

शहरातील पुरातन काळातील भवानी माता मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मागील अनेक वर्षापासून मंदिर परिसरात नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. तालुक्यातील अनेक गावातून भक्तगण दर्शनासाठी भवानी माता मंदिरात येतात . नऊ दिवस  समितीच्यावतीने अतिशय वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. 

नागपुरातही आहे 'आजीचा ढाबा', दहा रुपयात देते चार डोसा; गरजूंना आहे मदतीची गरज

अतिशय प्रसन्न वातावरणात शेकडो भक्तगणांची रेलचेल असते. भक्तिमय वातावरणाने हा परिसर गजबजलेला असतो. मंदिरातील कार्यक्रमात विशेष आकर्षण दांडिया कार्यक्रमाचे असते. यामध्ये शेकडो महिला ,युवती सहभागी होऊन उत्सव साजरा करतात. मात्र covid-19 यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने समितीने यावर्षी नवरात्र निमित्त आयोजित होणारे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहे. 

शिवाय याच मैदानावर अनेक वर्षापासून विजयादशमीला रावण दहन केले जाते. हजारो लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात कोविड संकटामुळे ही परंपरा खंडित झालेली आहे. यावर्षी रावण दहन होणार नाही अशी घोषणा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. दिनांक 17 ऑक्टोबर ला घटस्थापना आहे व 25 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. यामुळे भाविकांनी घरीच पूजा अर्चा करून सण साजरे करावे असे आवाहन समितीने केले आहे. शिवाय मंदिरात येणाऱ्या महिलांना  बंधने पाळण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

एकाच वेळी निघाली दोघींची अंत्ययात्रा; एकीच्या नशिबी शेवटचे सोपस्कारही नाही

सभा मंडपामध्ये एका वेळी 5 महिलांना प्रवेश देण्यात येईल, मास्क शिवाय प्रवेश नाही ओटी भरण्याकरिता देवीचे गर्भगृहात प्रवेश राहणार नाही सभा मंडपाचे द्वारातून श्री देवीचे दर्शन पुजा व ओटी देता येईल. दररोज होणाऱ्या आरती नंतर प्रसाद वितरण मंदिर तर्फे किंवा इतरांन तर्फे मंदिर प्रांगणात करता येणार नाही. मंदिर प्रांगणात दरवर्षीच्या "दांडिया"कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. रावण दहन या वर्षी रद्द करण्यात आला आहे. दरवर्षीचा महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No ravan dahan and navratri dandiya this year in chandrapur district