नागपुरातही आहे 'आजीचा ढाबा', दहा रुपयात देते चार डोसा; गरजूंना आहे मदतीची गरज 

Aaji ka Dhaba in nagpur giving 4 dosas in 10 rupees
Aaji ka Dhaba in nagpur giving 4 dosas in 10 rupees

नागपूर : मार्च महिन्यात कोरोना नावाचा व्हायरस भारतात आला. १३० कोटी लोकसंख्या असलेला आपला देश अवघ्या काही दिवसांत लॉकडाऊन झाला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता ' हा कोरोना जाणार कधी?' पण देशात काही लोक असेही होते ज्यांच्यापुढे फक्त एक नाही तर प्रश्नांचा आणि समस्यांचा अख्खा डोंगर होता. लहान व्यवसाय, त्यात कसाबसा उदरनिर्वाह करणारे हे लोक अक्षरशः हा डोंगर सर करण्याचा प्रयत्न करताना दिवसेंदिवस खचत चालले होते. सामाजिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक दुर्बल होत चालले होते. तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला, पण ही परिस्थिती किंचितही बदलली नाही.

पण, ते म्हणतात ना 'वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कोणाला मिळत नाही' तसेच काही झाले असावे ' बाबा का ढाबा' चालवणाऱ्या त्या वृद्ध, डोळ्यांत पाणी असणाऱ्या आजोबांसोबत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय चालू शकत नव्हता. ज्यांना जन्म दिला ते मुलंही सोडून गेले. अशा परिस्थितीत या वृद्ध व्यक्तीला बघून अक्षरशः संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आले. मग काय अख्ख्या देशाने 'बाबा का ढाबा'ला आर्थिक मदत केलीच पण यामुळे त्यांचे मुलंही परत आले हे विशेष. सोशल मीडिया फक्त गैरवापर करण्यासाठी नाही तर यामुळे मानवी जीवनात किती मोठा बदल घडवता येऊ शकतो याची प्रचिती त्यादिवशी संपूर्ण भारतीयांना आली.

पण, यानिमित्ताने अजून एक प्रश्न मनात आला आणि तो म्हणजे, 'बाबा का ढाबा' तर मोठा झाला पण आर्थिक परिस्थितीमुळे खचलेले असंख्य लहान मोठे व्यवसाय करणारे लोक असतील. ज्यांचे सुखी समाधानी आयुष्य कोरोनाने गिळंकृत केले असेल. त्या सगळ्यांचे काय? त्यांना कोण करणार मदत? त्यांच्या जीवनात सुखाचे क्षण कोण आणणार?

आपल्या राज्यात, विदर्भात इतकेच काय तर आपल्या शहरात बाबा का ढाबासारखे अनेक असे व्यावसायिक आहेत ज्यांचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त इतरांचं पोट भरून चालतो. मात्र कोरोनामुळे त्यांच्याकडे कोणीही फिरकत नाही. मात्र आता त्या सर्वांना आर्थिक आधाराची गरज आहे. ज्याप्रमाणे सोशल मीडियाने 'बाबा का ढाबा' ला जगात प्रसिद्ध केलं त्याचप्रमाणे इतर गरजू लोकांनाही सोशल मीडियामुळे मदतीचा हात मिळेल? या प्रश्नाचे उत्तर आता प्रत्येकाने देण्याची गरज आहे.

नागपुरातील आजीचा ढाबा 

नागपुरातील महाल भागात अशाच एका आजीचा ढाबा आहे. खरेतर हा ढाबा नसून एक लहान गाडी आहे. पोटापाण्यासाठी ही आजी येथे डोसा आणि इडली विकते. विशेष म्हणजे आजच्या महागाईच्या काळातही ही आजी १० रुपयाला चक्क ४ डोसा देते. कोरोनामुळे या आजीचाही व्यावसाय डबघाईला आला असावा. सोशल मिडिया विरांनो या आजीचा डोसा नक्की खा.    

त्यामुळे तुमच्या घराजवळ किंवा शहरात कुठेही असे गरजू व्यावसायिक दिसल्यास त्यांच्याकडून नक्की काहीतरी विकत घ्या किंवा त्यांनी तयार केलेल्या पदार्थांचं आस्वाद घ्यायला विसरू नका. तसंच तुमचा फोटो घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करायलाही विसरू नका. तुमची छोटीशी मदतही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com