coronaVirus:आता आठवडी बाजारही बंद! 

Now the akola market is closed
Now the akola market is closed

अकोला : विदेशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. जिल्ह्यात या विषाणूच्या संक्रमणात नागरिक येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना म्हणून शहरी भागातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी (ता. 17) दिले आहेत. त्यानंतर बाजार सुरु करण्याचे आदेश स्वतंत्रप्रमाणे निर्गमित करण्यात येतील.

कोरोना विषाणू फैलावास प्रतिबंध करण्यासाठी बहुसंख्येने लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक जत्रा, यात्रा, तसेच अन्य धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक सर्व कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानंतर आता लोकांची गर्दी टाळण्यासाठी नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका, शहरी भागात भरणारे आठवडी बाजारही एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वाहतूक व्यवस्थेचे निर्जंतूकीकर करा!
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त, राज्य परिवहन महामंडळांचे विभाग नियंत्रक व रेल्वेचे मुख्य प्रबंधक यांना खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याअंतर्गत राज्य परिवहन महामंडळ तसेच खाजगी लक्झरी बसेसच्या बसस्थानकांवर प्रवाशांसाठी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. कोणताही प्रवासी बसमधून उतरल्यावर अथवा बसमध्ये चढण्याआधी हात धुतील याची खबरदारी घेऊन व्यवस्थेची सज्जता ठेवावी. बसेसचे वेळचे वेळी निर्जंतूकीकरण करुन बसेसच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध फौजदारी
जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्ती वा संस्थेस अनधिकृतरित्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव वा त्यासंदर्भात कोणतीही माहिती, अफवा पसरविण्यास, प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अशी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

उघड्यावर मांस विक्री व विल्हेवाटीस प्रतिबंध
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उघड्यावर मांस विक्री तसेच जिवंत वा मृत कोंबड्यांची विल्हेवाट सार्वजनिक ठिकाणी करण्यास साथरोग अधिनियम १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार प्रतिबंध करण्यात आला आहे. सदर आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल.

लग्न, समारंभ आयोजकांना आवाहन
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे सावट असताना ज्यांच्याकडे नजिकच्या काळात विवाह समारंभांचे आयोजन आहेत अशा लोकांनी समारंभ पुढे ढकलावेत अन्यथा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

सर्वोपचारमध्ये समूपदेशन कक्ष
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे सावट असल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात समूपदेशन व माहिती कक्ष सुरु करण्यात आला आहे. रुग्णालयात येणाऱ्या लोकांना कोरोना संसर्गाबाबत माहिती व समूपदेशन देण्यात येत आहे. सकाळी ८ वाजतापासून ते बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज संपेपर्यंत हा कक्ष कार्यान्वित राहिल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com