esakal | आता चिन्नोर तांदूळ उत्पादकांना मिळणार लाभ; ब्रॅंडिंग करून तांदूळ देशभर पोहोचणार
sakal

बोलून बातमी शोधा

Now Chinnor rice growers will get benefits By branding rice will reach all over the country

आता या शेतीजन्य पदार्थांना दुप्पट किंमत मिळाली आहे. ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ग्राहक सर्वसाधारण बाजारपेठेच्या ४० टक्केपेक्षा अधिक किंमत द्यायला तयार आहेत. यासाठी पुण्यातील बौद्धिक संपदा आणि भौगोलिक मानांकन विषयाचे अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांचे सहकार्य घेणार येणार आहे.

आता चिन्नोर तांदूळ उत्पादकांना मिळणार लाभ; ब्रॅंडिंग करून तांदूळ देशभर पोहोचणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : महाराष्ट्रात अनेक धानाच्या जाती आहेत. ज्यांची नैसर्गिक सुगंध आणि चव आहे. त्यापैकी पश्‍चिम महाराष्ट्रातील आंबेमोहर तांदूळ आणि आजरा घनसाळ या तांदळास भौगोलिक मानांकन मिळाले आहे. तसेच भंडारा जिल्हा हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील तांदूळ ‘फाइन तांदूळ’ म्हणून ओळखला जातो. असा तांदूळ देशात कुठेही मिळत नाही. जिल्ह्यातील प्रसिद्ध चिन्नोर या तांदळाच्या वाणाला लवकरच भौगोलिक मानांकन (जिओग्रॉफिक इंडिकेशन) मिळणार आहे. या वाणाचे ब्रॅंडिंग करून हे तांदूळ देशभर पोहचविले जाणार आहेत. पुढील खरीप हंगामापासून या वाणाची लागवड केली जाणार आहे.

भंडारा जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असला तरी येथील शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नसल्याने दरवर्षी आर्थिक तोटा सहन करावा लागतो. चिन्नोर तांदळाला विशिष्ट सुगंध आणि चव आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, शेतमालाचे ब्रॅंडिग करणे अत्यावश्‍यक आहे.

जाणून घ्या - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात

महाराष्ट्रात अनेक धानाच्या जाती आहेत. ज्यात नैसर्गिक सुगंध आणि चव आहे. त्यापैकी पश्‍चिम महाराष्ट्रातील आंबेमोहर तांदूळ आणि आजरा घनसाळ या तांदळास भौगोलिक मानांकन मिळाले आहे. आता या शेतीजन्य पदार्थांना दुप्पट किंमत मिळाली आहे. ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ग्राहक सर्वसाधारण बाजारपेठेच्या ४० टक्केपेक्षा अधिक किंमत द्यायला तयार आहेत. यासाठी पुण्यातील बौद्धिक संपदा आणि भौगोलिक मानांकन विषयाचे अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांचे सहकार्य घेणार येणार आहे.

फार्मर प्रोड्युसर कंपनी उभारणार

चिन्नोर तांदळाची लागवड करण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करून शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात येणार आहे. या वाणाचे उत्पादन सेंद्रीय पद्धतीने होणार आहे. चिन्नोर वाणाचे ब्रॅंडिंग झाल्यानंतर त्याला देशभरात बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे.

संबंधित शेतकऱ्यांना लाभ

पुणेरी पगडी, वायगाव हळद, बासमती तांदूळ, दार्जिलिंग चहा, भिवापुरी मिरची आदी भौगोलिक मानांकन मिळविलेल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहेत. यानंतर संबंधित शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे.

महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती

आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी, कमोद, काळी साळ, कोलपी, कोलम (वाडा कोलम), कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ, घुड्या चिन्नोर, चिमणसाळ, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, जीर, झिनी, झिल्ली, टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा, तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ, पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा, रत्‍नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, सुरती, हरकल, हरकल पटनी, हळा कोळंबा

अधिक वाचा - Flat Foot : पाय सपाट असेल तर त्वरित करा उपचार; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

तामिळनाडूमधील तांदळाच्या जाती

कादिरमंगलम्

कर्नाटकातील तांदळाच्या जाती

नाटी, बरबट्ट, मोलबट्ट

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

loading image