काय सांगता! आता होणार पक्षी आणि सापांची अनोखी निवडणूक: निसर्गसाथी फाउंडेशनचा पुढाकार

now digital elections for Birds and Snakes in wardha district
now digital elections for Birds and Snakes in wardha district

नंदोरी (जि. वर्धा) : निसर्गसाथी फाउंडेशन गत काही वर्षांपासून पर्यावरण तथा निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहे. निसर्ग चक्र सुरक्षित तरच पर्यावरण संतुलन चांगले राहील. मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी निसर्गातील पशू, पक्षी आदींचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे निसर्ग साथी फाउंडेशननी हेरून हिंगणघाट शहरासह तालुक्‍यातील पशू, पक्षी सुरक्षित राहण्यासाठी तालुका पक्षी व सर्प डिजिटल निवडणुकीचे आयोजन 11 ते 15 फेब्रुवारी 21 दरम्यान केले आहे. यात तालुक्‍यातील सर्व नागरिकांचा समावेश राहणार आहे.

राज्यात काही मोजक्‍या जिल्ह्यात शहर पक्षी निवडले गेले असले तरी हिंगणघाट तालुक्‍यात पहिल्यांदाच तालुका पक्षी निवडला जाणार आहे. देशासह राज्यात अन्य कुठेही तालुका सर्प आजतागायत निवडला गेला नाही. मात्र निसर्ग साथी फाउंडेशनचे पुढाकाराने राज्यात पहिल्यांदाच तालुका सर्प निवडला जाणार आहे. 

नागरिकांना पाठविण्यात येणाऱ्या लिंक सोबत पाठविलेल्या पीडीएफ मध्ये या सर्व पक्षी, सर्प उमेदवारांची माहिती दिली आहे. याचे अवलोकन करून नागरिकांनी आपला आवडता पक्षी, सर्प निवडण्याचे आवाहन निसर्ग साथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू, डॉ. बालाजी राजूरकर, प्रभाकर कोळसे, अनिल कानकाटे, राकेश झाडे, नियाझुद्दीन सिद्धीकी, परिक्षित ढगे, प्रा. अश्‍विनी ढेकरे, प्रा. सुलभा कडू, प्रा. जितेंद्र केदार, राजश्री विरुळकर, गुणवंत ठाकरे, रूपेश लाजुरकर, आशीष भोयर, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. अभिजित डाखोरे आदींनी केले आहे.

या तालुका पक्षी, सर्प निवडणुकीत विजयी उमेदवारांना निसर्ग साथी फाउंडेशनच्या वतीने आगामी काळात यथायोग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या तालुका पक्षी, सर्प निवडणुकीकरिता नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट वर्धा वनविभाग सहकार्य करणार असल्याचे निसर्ग साथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची माहिती विषद करताना सांगितले.

अशी होणार डिजिटल निवडणूक

तालुक्‍यातील नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध व्हाट्‌स ऍप, टेलिग्राम, फेसबुकच्या माध्यमातून हीींिी://षीीो.सश्रश/र्गीइणइहज्ञठीरज्ञक5ीुाल ही लिंक 11 फेब्रुवारी सकाळी 7 वाजेपासून 15 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करण्यासाठी लिंक ओपन राहील. यात ठिपक्‍याचा पिंगळा, कोतवाल, चिमणी, शिक्रा, कावळा, गायबगळा या सहा पक्षी उमेदवाराचा तर अजगर, धामण, धोंड्‌या, तस्कर, कवड्‌या अशा पाच सर्प उमेदवाराचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com