आता शेतकरी करू शकतील शेतात काम; लाँकडाऊनमधून सुट

farm work
farm work
Updated on

यवतमाळ  : कोरोना विषाणू (कोव्हिड-19)मुळे लॉकडाऊनचा कालावधी येत्या तीन मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. यादरम्यान जनतेच्या अडचणी जाणून घेऊन शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात शेती व शेतीसंबंधी पूर्ण कामे सुरू राहणार आहेत. काही प्रमाणात दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी काहींमध्ये शिथिलता देण्यात येणार असून, काहींवर निर्बंध कायम असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले आहे.

कृषी व कृषी संबंधित कामाअंतर्गत शेती व फळबागा संबंधातील सर्व कामे पूर्णपणे कार्यरत राहतील. शेतामध्ये शेतकरी व शेतमजूर यांना शेतीविषयक कामे करण्यास मुभा राहील. कृषी उत्पादने खरेदी करणाऱ्या यंत्रणा व शेतमालांची उद्योगाद्वारे, शेतकऱ्याद्वारे, शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारे थेट विपणन हमी भावाने खरेदी करणाऱ्या यंत्रणांची कामे सुरू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मंडी किंवा महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेल्या मंडी सुरू राहतील. शेतीविषयक यंत्राची व त्यांच्या सुट्या भागाची विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने व त्यांचा पुरवठा साखळीसह सुरू राहील. शेतीकरिता उपयोगात येणारे भाडेतत्वावरील अवजारे पुरवठा करणारे केंद्र, रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांचे उत्पादन वितरण व किरकोळ विक्री सुरू राहील. शेतमालाची काढणी व पेरणी करणाऱ्या मशीन्स जसे कंबाईंड हार्वेस्टर व इतर कृषी अवजारांची राज्याअंतर्गत व आंतरराज्य वाहतूक सुरू राहणार आहे. मासेमारी व आनुषंगिक व्यवसायाकरिता वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे.
या सेवा प्रतिबंधितच
सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेमधून सर्व प्रवासी हालचाल, सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बस बंद राहतील. शैक्षणिक प्रशिक्षण, संस्था व शिकवणी, विशेष परवानगी असलेल्या व्यतीरिक्‍त इतर सर्व औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना, ऑटोरिक्षा व सायकल रिक्षा, सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, व्यायमशाळा व क्रीडा कॉम्प्लेक्‍स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे, सर्व सामाजिक, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्ये, इतर मेळावे, सर्व धार्मिक स्थळे, पूजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येतील.

सविस्तर वाचा - माहिती लपवून समाजाचे शत्रू बनू नका : तुकाराम मुंढे
या सेवा राहणार सुरू
दूधसंकलन करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याचे वितरण व विक्री, पशुपालन, कुकुटपालन व आनुषंगिक कामे, बॅंका, एटीएम, बॅंकेसाठी आवश्‍यक आयटी सेवा, बॅंकिंग संवादक/ प्रतिनिधी सेवा, इत्यादी सेवा नेमून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील. सार्वजनिक सुविधेअंतर्गत पेट्रोल, डिझेल, एलपीजीगॅस यांची वाहतूक, वितरण, साठवण व किरकोळ विक्री, पोस्ट ऑफीस संबंधित सर्व सेवा, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन नगरपरिषदस्तरावर सुरू राहतील. दूरसंचार व इंटरनेट या सेवा सुरू राहतील. वाहतूक करणारी ट्रक त्यासोबत दोन वाहनचालक व एक मदतनीस असणे आवश्‍यक आहे. मालवाहतुकीसाठी जाणारे खाली ट्रक किंवा मालवाहतूक करून परत जाणारे खाली ट्रक यांनाही परवानगी राहील. वाहनचालक यांनी वाहन चालविण्याचा परवाना सोबत ठेवणे बंधनकारक आहे. सेवा देणाऱ्या व्यक्‍ती जसे इलेक्‍ट्रीशियन, संगणक, मोबाईल दुरुस्ती, वाहन दुरुस्त करणारे केंद्र, नळ कारागीर (प्लंबर), सुतार आदी जण शासनाच्या सूचनेनुसार कामे करू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com