आता हेल्मेट आणि कॉलेजबॅग बाळगणारे असणार पोलिसांच्या रडारवर; चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या 

Now police give attention to bikers having helmet and bags
Now police give attention to bikers having helmet and bags

अमरावती ः गाडगेनगर हद्दीत वाढत्या चेनस्नॅचिंगच्या घटना लक्षात घेता, हेल्मेटधारक व पाठीवर सतत कॉलेजबॅग लावून फिरणाऱ्या संशयित पोलिसांच्या रडारवर आहे.

चेनस्नॅचिंगच्या दोन घटनेनंतर पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यापैकी सोनसाखळी हिसकवणाऱ्या दोन दुचाकीस्वारांपैकी चालविणाऱ्याचे डोक्‍यावर हेल्मेट आणि कॉलेजबॅग तर, मागे बसलेल्या व्यक्तीच्याही पाठीवर कॉलेजबॅग बाळगली आहे. त्यापैकी दोघांनी काळ्या व पांढऱ्या रंगाचेच मास्क लावलेले होते. .

ज्याठिकाणी चेनस्नॅचिंग घडली तेथील फुटेजमधुन असे प्रकार दिसून येते. पाठीवर कॉलेजबॅग असल्याने दागिने घातलेल्या महिलांच्या जवळ थांबून बोलण्याचा प्रयत्न करून, मागे बसलेली व्यक्ती गळ्यातील चेन हिसकवत असल्याचे दिसून आले. या लोकांच्या दुचाकीवर एक तर नंबर प्लेट नसते, आणि असली तरी ती, कोरी असते. नंबरप्लेट नसलेले संशयित दुचाकीस्वार दिसल्यास त्यांची चौकशी करून गाडगेनगर पोलिसांना माहिती द्यावी. असे आवाहन पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी केले. 

अशा संशयितांजवळ पाठीवर असलेल्या कॉलेजबॅगमध्ये महाविद्यालयाची पुस्तके नसतात, तर नियमीत वापरण्याचे कपडे त्यात असतात. घटना घडल्यानंतर हे सराईत ओळख पटू नये म्हणून बॅगमधील दुसरे कपडे घालून पुन्हा फिरत असल्याचे दिसून आले.

संशयित आरोपी निघाला पॉझिटिव्ह

ऑगस्ट 2020 मधील एका चेनस्नॅचिंगच्या घटनेची कबुली देणाऱ्यास गुन्हेशाखेने अकोला कारागृहातून अमरावतीच्या गुन्ह्यात अटक केली. परंतु अमरावतीत त्याची कोविड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला पुन्हा गुन्हेशाखेने अकोला कारागृहात पोचवून दिले. अकोला कारागृहाने तो बरा होईपर्यंत आत घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला पुन्हा अमरावतीत परत आणावे लागले. आता पोलिसांच्या उपस्थितीत पंधरा दिवस त्याच्यावर कोविड रुग्णालयात उपचार होतील.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com