खुशखबर! आता घर आणि दुकानांनाही मिळणार स्टार रेटिंग; करात मिळणार सूट; राज्यात पहिलाच प्रयोग    | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Now star ratings also available for houses and shops for discount in tax in wardha

यात दिलेले उपक्रम जर घरमालक किंवा दुकानमालकाने राबविले तर त्याला तीन, पाच आणि सात स्टार देण्यात येणार आहे. या उपक्रमात होत कंपोस्टिंग करणाऱ्या घरांची तपासणी करून 350 रुपये अनुदान देत कंपोस्टिग बकेट वापराकरिता दोन टक्‍के सूट करातून देण्यात येणार आहे

खुशखबर! आता घर आणि दुकानांनाही मिळणार स्टार रेटिंग; करात मिळणार सूट; राज्यात पहिलाच प्रयोग   

वर्धा : निसर्गाशी संबंधित ंपंचतत्त्वाव आधारित उपाययोजना आखून शाश्‍वत जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी माझी वसुंधरा अभियान राबवत आहे. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबवावयाचे आहे. त्या अनुषंगाने वर्धा पालिकेने यात ठराव घेत पालिका क्षेत्रातील घर, दुकानांना स्टार रेटिंग देत करात सूट देण्याचा एकमताने ठराव घेतला आहे. असा निर्णय घेणारी वर्धा ही राज्यातील पहिली पालिका ठरणार आहे.

यात दिलेले उपक्रम जर घरमालक किंवा दुकानमालकाने राबविले तर त्याला तीन, पाच आणि सात स्टार देण्यात येणार आहे. या उपक्रमात होत कंपोस्टिंग करणाऱ्या घरांची तपासणी करून 350 रुपये अनुदान देत कंपोस्टिग बकेट वापराकरिता दोन टक्‍के सूट करातून देण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या घरांना दीड हजार रुपये अनुदान आणि अतिरिक्‍त दोन टक्‍के मालमत्ता करातून सूट देण्यात येणार आहे.

हेही वाचा संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा

सौर ऊर्जेवर आधारित पाणी गरम करणारी यंत्रणा किंवा विद्युत निर्मिती करणारी यंत्रणा लावण्याकरिता दोन टक्‍के मालमत्ता करात सूट व त्यांनी भरलेल्या विकास शुल्काचा दहा टक्‍के रक्‍कम सूट म्हणून परत देण्यात येणार आहे.\

घरामध्ये निघणाऱ्या सांडपाणी पुनर्वापर करण्याकरिता यंत्रणा लावल्यास दोन टक्‍के मालमत्ता करात सूट देण्यात येणार आहे. घरात पाच किंवा पाचपेक्षाजास्त दोन मिटर पेक्षा जास्त उंचीचे वृक्ष लावल्यास दोन टक्‍के मालमत्ता करात सूट देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्‍त घरामधील लॉन किंवा टेरीस गार्डन विकसित केलेले असणे, घरामध्ये छतावरील पाण्याच्या टाकीला वॉटर अलार्म किंवा व्हॉल्व्ह बसविलेला असणे, घरामध्ये बॅटरी चलित वाहनाचा किंवा सायकलाचा वापर करणे, कमी ऊर्जा खर करणारी यंत्र असणे आदी मुद्यांच्या आधारे तपासणीअंती अशा घर आणि दुकानांना स्टार रेटिंग देत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

नक्की वाचा 'ग्रामपंचायत बिनविरोध निवडून या अन् २५ लाखांची भेट घ्या'

पर्यावरण रुची वाढविण्यासाठी घेरा स्पर्धा

नागरिकांची पर्यावरणाप्रती रूची वाढावर याकरिता विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात पुष्प पदर्शनी, दूर्मिळ वनस्पती औषधी प्रदर्शनी, होम गार्डन, परसबाग स्पर्धा, निसर्गपूरक घर स्पर्धा घेण्यात येणार आहे. पालिकेच्या स्माशनभूमीलगत असलेल्या जागेवर फुलपाखरू उद्यान उभारणे, पर्यावरण रक्षणाची शपथ देणे या अभियानाची प्रसिद्धी करणे या सारखे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहे. नगरपरिषद क्षेत्रात मोटार वाहन विरहित दिवस राबविणे, सायकल वापर प्रोत्साहन देण्याकरिता सायकल मेरेथॉनचे आयोजन करणे आदी बाबींचा यात विचार करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध वसाहती तयार करण्यात आल्या आहेत. यात वॉटर हार्वेटींग करणाऱ्या वसाहतीला पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Wardha
loading image
go to top