esakal | संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Joshi and tukaram mundhe fight the last year Nagpur last year update

मुंढे यांच्यावर स्मार्ट सीईओपदाचा जबरदस्तीने कार्यभार घेऊन २० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप जोशी यांनी केला व पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. 

संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या चर्चेने सुरू झालेल्या वर्षाचा शेवट त्यांच्या राजीनाम्याने झाला. परंतु, सरत्या वर्षात नागपूरकरांत मुंढेच्याच कार्यशैलीच्या चर्चा होता. या वर्षात कोरोनाने ९० हजारांवर नागपूरकर बाधित झाले. नागपूरकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतही आमूलाग्र बदल झाला. जीवनावश्यक वस्तू, औषधीची दुकाने सुरू होती. 

तुकाराम मुंढे नागपुरात

आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिकेत बदली झाली. त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या भेटीसाठी विशेष तास राखीव ठेवले. मुंढे यांनी शहराचे विकास कामेही रोखली. त्यांच्या कार्यशैलीमुळे सत्ताधाऱ्यांत चांगलाच रोष निर्माण झाला.

सविस्तर वाचा - पोलिसांना झाले काय? वाहतूक पोलिस शाखेत एटीपीच्या नावाखाली वसुलीबाज युवक

मनपा ॲक्शन मोडमध्ये

शहरात ११ मार्चला पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. त्यानंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या कोरोनाबळीची नोंद झाल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी संपूर्ण सतरंजीपुरा परिसर सील केला. मुंढे यांच्या कडक धोरणाला काही भागात विरोधही झाला. 

मुंढे-सत्ताधारी संघर्ष तीव्र

कोरोनासंदर्भातील उपाययोजना तसेच वस्त्या सील करण्यावरून सत्ताधारी व मुंढे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. याचे पडसाद जूनमध्ये झालेल्या महासभेत पडले. नगरसेवकांच्या ताशेऱ्यामुळे मुंढे चक्क सभागृह सोडून गेले. 

महापौरांची आयुक्तांविरोधात तक्रार

मुंढे यांच्यावर स्मार्ट सीईओपदाचा जबरदस्तीने कार्यभार घेऊन २० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप जोशी यांनी केला व पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती.

जाणून घ्या - मेहूणीशी असभ्य वर्तन जावयाला भोवले; विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा

गडकरींचे पंतप्रधान कार्यालयाला पत्र

मुंढे यांच्याविरोधात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे तक्रार केली होती. मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले होते. 

मुंढेंची बदली, राधाकृष्णन आले

मुंढे यांची ऑगस्टमध्ये राज्य सरकारने बदली केली. त्यांच्या जागेवर राधाकृष्णन बी. महापालिका आयुक्त म्हणून आले. मुंढे यांनी १२ सप्टेंबरला नागपूर सोडले. नागपूर सोडताना मोठ्या प्रमाणात नागपूरकर त्यांच्या बंगल्यापुढे उभे झाले. 

राधाकृष्णन यांनीही रोखली कामे

आयुक्त राधाकृष्णन यांनीही विकास कामांना रोखले. त्यांच्याविरोधातही सत्ताधारी नगरसेवकांनी वॉर्ड निधी देत नसल्याची ओरड केली. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतनसह मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना सुरू केली

अधिक माहितीसाठी - शाळेतील मुलांना अमाप संधी, या वयापासून करा स्पर्धा परीक्षेची तयारी, जाणून घ्या सोप्या टिप्स

महापौर जोशींचा राजीनामा

वर्षाच्या शेवटी महापौर संदीप जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला. मनपात अलीकडच्या काळात प्रथमच महापौरपद १३-१३ महिने दोन सदस्यांना विभागून देण्यात आले. जोशी यांनी पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढविली.

go to top