esakal | नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव 
sakal

बोलून बातमी शोधा

Number of accidents are increasing after unlocking

आता सर्वकाही अनलॉक होताच दुचाकी, चारचाकी वाहनांचा वेग सुसाट वाढल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहो. कोरोनातील शिस्त शिथिलतेत गमावल्याचे चित्र बघावयास मिळते.

नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव 

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाउन घोषित करण्यात आला. नागरिक घरात थांबून सुरक्षित राहिले. याच काळात दुचाकी, चारचाकी वाहनांची चाकेही थांबल्याने अपघाताचे प्रमाण घटले होते. प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. आता सर्वकाही अनलॉक होताच दुचाकी, चारचाकी वाहनांचा वेग सुसाट वाढल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहो. कोरोनातील शिस्त शिथिलतेत गमावल्याचे चित्र बघावयास मिळते.

मार्च महिन्यात एंट्री झालेला कोरोना अजूनही गेला नाही. तीन महिन्याच्या कडक लॉकडाउननंतर हळूहळू अनलॉक प्रक्रिया राबविण्यात आली. आता तर, बाजारपेठेच्या वेळेत बदल झाला असून, ये-जा करण्याची मुभा मिळाली आहे. कोरोनात सुरक्षित जीवन जगण्याची एक शिस्त लागली होती. 

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या आणि सुसाट धावणाऱ्या वाहन धारकांकडून दंड वसुलीची मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडण्याचे तरुण टाळत होते. पोलिस रस्त्यावर राहत असल्याने वाहनाच्या वेगावर नियंत्रण आले होते. आता, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तरीदेखील कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. 

कोरोनात सुरक्षित राहून अनेकांनी आपला जीव वाचविला. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहनांचा वेग सुसाट वाढल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. शहरासह ग्रामीण भागात, महामार्गावर अपघात होत आहेत. वाढत्या अपघाताची संख्या चिंताजनक आहे. यात बहुतांश जणांना आपला जीव तर गमवावा लागतोच. शिवाय अनेकांना कायमचे अपंगत्वही येत आहे. या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने कडक पाऊल उचलणे गरजेचे आहे.

जबाबदारी प्रत्येकाचीच

लाडाकौतुकाने हट्ट पूर्ण करण्यासाठी कोणताही विचार न करता मुलांच्या हाती दुचाकी दिली जाते. मुलेही रस्त्यावर येवून वाहने सुसाट वेगात चालवितात. तरुणांच्या हातातही महागड्या दुचाकी आल्या आहेत. मुलांच्या हाती वाहन देताना त्यांचे कान कुटुंबातील व्यक्तींनी टोचले पाहिजे. मात्र, वाहनाच्या अमर्याद वेगाबाबत कुणीही बोलत नाही. ही चिंताजनक बाब आहे. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे.

जाणून घ्या - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का


कोरोनातील आठवणी कटू असल्या तरी काही शिस्तीच्या गोष्टीही शिकविल्या. या काळात अपघाताच्या संख्येत घट झाली होती. आता दररोज अपघात होत आहेत. जीवन अनमोल आहे. ते सांभाळता आलेच पाहिजे. सुसाट धावणाऱ्या वाहन चालकांवर निश्‍चित कारवाई करण्यात येईल. कुणाचीही गय केली जाणार नाही.
श्‍याम सोनटक्के
पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top