esakal | परिचारिकेने वाचवले नऊ शिशूंचे प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

परिचारिकेने वाचवले नऊ शिशूंचे प्राण

परिचारिकेने वाचवले नऊ शिशूंचे प्राण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो). नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग. मध्यरात्री पावणे तीनची वेळ. अचानक आगीचा भडका उडाला. नऊ नवजात शिशूंचा व्हेंटिलेटर, वॉर्मरवर श्‍वास सुरू होता. त्यांचा जीव गुदमरतो की काय अशी भीती. परिचारिका एकटीच कर्तव्यावर. तिने प्रसंगावधान राखत कापडात गुंडाळलेल्या दोन शिशूंना कुशीत घेत बाहेर काढले. यानंतर एकापाठोपाठ नऊ शिशूंना बाहेर काढत त्यांना सुखरूप वॉर्डात पोहोचविले. या धाडसाला सलाम केल्यावाचून राहवत नाही. त्या परिचारिकेचे नाव सविता इखार.
मेयोत शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली होती. यापूर्वीदेखील 1998 मध्ये बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागाला शॉर्ट सक्रिटमुळेच आग लागली होती. त्यावेळी विद्या कावळे या परिचारिकेने सात नवजात शिशूंना पदरात लपवून त्यांना बाहेर काढले होते. शॉर्ट सर्किटमुळे दुसऱ्यांदा आग लागली. या जीवघेण्या घटनेमुळे येथील वीज यंत्रणेतील दोष दुसऱ्यांदा चव्हाट्यावर आले. येथील वीज यंत्रणा एकाच फेजवर असून येथे कर्तव्यावर एक परिचारिका ठेवली होती. यामुळे येथील व्यवस्थापनापुढेही प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. यातील काही बालकांना मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे.
loading image
go to top