esakal | महिला बचतगटाने उभारली रोपवाटिका; रोपांचे बुकिंगही सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

महिला बचतगटाने उभारली रोपवाटिका; रोपांचे बुकिंगही सुरू

महिला बचतगटाने उभारली रोपवाटिका; रोपांचे बुकिंगही सुरू

sakal_logo
By
मनोज आत्राम

चुनाळा (जि. चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील पंचाळा गावातील महिलांनी निसर्ग शेतकरी बचतगटाची स्थापना (Establishment of Nature Farmers Self Help Group) केली. या गटाला कृषी विभागाकडून रोपवाटिकेसाठी दोन लाखांचे अनुदान (Two lakh grant for nursery) मिळाले. या अनुदानातून महिलांनी रोपवाटिका सुरू केली. रोपवाटिकेत उच्च प्रतीची रोपे तयार करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोपांचे बुकिंगही (Booking of seedlings also started) केले आहे. (Nursery-set-up-by-women's-self-help-group)

रोपवाटिकेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते अलीकडेच करण्यात आले. पंचाळा येथील महिलांनी एकत्र येत निसर्ग शेतकरी महिला बचतगटाची स्थापना केली. संसाराला हातभार लागावा यासाठी गटाच्या महिलांनी काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेतले. कृषी विभागाने रोपवाटिकेची माहिती दिली. त्यानंतर या महिला तयार झाल्या. गटात १३ महिला सहभागी आहेत.

हेही वाचा: सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

त्यांना कृषी विभागाच्या (आत्मा)कडून दोन लाख तीस हजारांचे अनुदान रोपवाटिकेसाठी मंजूर झाले. त्यापैकी एक लाख १४ हजारांचा पहिला हप्ता प्राप्त झाला. उर्वरित रक्कम महिलांनी टाकून रोपवाटिका पूर्ण केली. रोपवाटिकेच्या एक हजार स्केअर फूट जागेत २५ पाकिटे मिरची, चार पाकिटे कोबी आहेत. आतापासूनच अनेक शेतकऱ्यांनी रोपांची बुकिंग करून ठेवलेली आहेत. रोपे पोचता करण्याचे कामसुध्दा गटाच्या महिलाच करणार आहे.

यानंतर टमाटर, वांगे, टरबूज, शिमला मिरचीचेही उत्पादन घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष यशोधा निरंजने यांनी सांगितले. कृषी सभापती उरकुडे यांनी वाटिकेत उच्च प्रतीचे रोपे तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. त्यात निरंतरता कायम ठेवावी. त्यासाठी हवी ती मदत करायला जिल्हा परिषद तयार असल्याचे सांगितले. याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती कुंदा जेनेकर, उपविभागीय कृषी अधिकारी मोरे, तालुका कृषी अधिकारी मक्कापलीवार, पोलिस पाटील विनोद भोंगळे, उपसरपंच बाळानाथ वडस्कर, विकास देवाळकर, भाऊराव चंदनखेडे, आकाश चोथले यांची उपस्थिती होती.

गटातील सर्व माहिला शेतकरीच आहे. रोपवाटिकेत रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्याला आता मागणीही आहे. रोपे पोहोचविण्याचे काम आम्ही सदस्यच करणार आहोत.
- यशोदा निरंजने, अध्यक्ष, निसर्ग महिला बचतगट, पंचाळा

(Nursery-set-up-by-women's-self-help-group)

loading image