esakal | सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : वाठोडा परिसरात सेक्स रॅकेट (Sex racket) चालविणाऱ्या महिलेने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १८ लाखांनी (18 lakh fraud) गंडा घातला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी महिला ही कुंटणखाना चालविण्याच्या प्रकरणात सध्या कारागृहात आहे. अर्चना शेखर वैश्यमपायल (३८, रा. प्रगतीनगर, कैलासनगर) आणि राजकुमार भय्यालाल गुप्ता (४३, रा. नवीननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Woman-cheated-Rs-19-lakh-in-Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना ही पूर्वी भाजीपाला विक्रीचा धंदा करायची. त्यामुळे तिची भाजीपाला विकणाऱ्या गोरगरीब महिलांची ओळख होती. तिने महिलांना पैसे जमा केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे काही महिलांनी पतीच्या आडून अर्चनाकडे पैसे जमा करायला सुरवात केली.

हेही वाचा: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही

सुरवातीला जास्त परतावा देखील दिला. त्यामुळे महिलांचा तिच्यावर विश्वास बसला. त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्चनाकडे पैसे गोळा करायला सुरवात केली. त्यात बोरकुटे पाटीलनगर येथील वर्षा (५०) महिलेचा देखील समावेश होता. उमाठे यांनी मोठ्या प्रमाणात पैसे अर्चनाकडे जमा केले होते. मागील वर्षी टाळेबंदीमुळे अर्चनाचा भाजीपाल्याचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे तिने थेट सेक्स रॅकेट तयार केले.

तिने वाठोड्यात किरायाने खोली घेऊन कुंटणखाना सुरू केला. वाठोडा परिसरातील तिच्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने धाड घालून रंगेहात पकडले होते. तेव्हापासून ती कारागृहात आहे. अर्चनाने वर्षा यांच्यासह पाच महिलांची १९ लाखांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी वर्षा यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

(Woman-cheated-Rs-19-lakh-in-Nagpur)

loading image
go to top