
दिवाळीच्या सुट्ट्या असताना येथील चंद्रशेखर आझाद हिंदी प्राथमिक शाळेतून पोषण आहार शिजविण्यासाठी असलेला सिलिंडर, गंज आणि पाण्याची अर्धा अश्वशक्तीची मोटार चोरट्याने लंपास केल्याची तक्रार प्रीती मुलचंद गौर यांनी पोलिसात दिली.
पुलगाव (जि. वर्धा) : चंदशेखर आझाद हिंदी प्राथमिक शाळेतील पोषण आहाराचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. कुलदीप ऊर्फ कल्लू ऊर्फ दीपक रामदास चंदनव (वय २९) रा. आर्वी नाका चौक, वॉर्ड जुना पुलगाव आणि प्रकाश नारायण तिवसकर (वय ५६) रा. हाउसिंग बोर्ड कॉलनी पुलगाव, अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
हेही वाचा - वाघ बघायचाय? पेंच- ताडोब्यात होतेय हमखास दर्शन; ही आहे...
दिवाळीच्या सुट्ट्या असताना येथील चंद्रशेखर आझाद हिंदी प्राथमिक शाळेतून पोषण आहार शिजविण्यासाठी असलेला सिलिंडर, गंज आणि पाण्याची अर्धा अश्वशक्तीची मोटार चोरट्याने लंपास केल्याची तक्रार प्रीती मुलचंद गौर यांनी पोलिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता ही चोरी कुलदीप चंदनव आणि प्रकाश तिवसकर यांनी केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हवालदार राजेंद्र हाडके, संजय पटले, पंकज टाकोणे, शरद सानप यांनी केली.
हेही वाचा - Big Breaking : वाढदिवस साजरा करायला गेले, पण वाटतेच...
आणखी चोरीची दिली कबुली -
सदर गुन्ह्यातील आरोपी कुलदीप चंदन व प्रकाश तिवसकर या दोघांनी या व्यतिरिक्त पाटणी शाळेसमोरील मंदिरातही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखी चोरी उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.