
गडचिरोली : ओबीसी, एनटीव्हीजे, एसबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गुरुवार (ता. २०) धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (गृह) व उपमुख्यमंत्री (वित्त) यांच्या उपस्थितीत २९ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपन्न झालेल्या बैठकीत तसेच ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या बेमुदत उपोषणा समाप्तीच्या वेळी राज्य शासनाने २९ सप्टेंबर २०२३ च्या बैठकीतील प्रलंबित मागण्या तत्काळ मार्गे लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.