बापरे... एकाचवेळी दोघींवर अत्याचार ; दोन्ही पीडिता अल्पवयीन

रूपेश खैरी
Sunday, 9 August 2020

सहा ऑगस्ट रोजी आई-वडील घरी नसल्याने दोन्ही मैत्रिणी घराच्या अंगणात खेळत होत्या. दरम्यान, छोटू तिथे आला आणि दोघींनाही घरातील बेडरूममध्ये घेऊन गेला.

वर्धा : दिवसेंदिवस घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे समाजामन सुन्न झाले असून, पोलिसांसमोरही आव्हान उभे ठाकले आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना वर्धेत उघडकीस आली. दोन अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केल्याने वर्धेत खळबळ उडाली आहे.   

घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात नेत एकाच वेळी दोघींवर अत्याचार केल्याची घटना सिंदी (मेघे) परिसरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली. छोटू ऊर्फ स्नेहल पुरुषोत्तम मून (वय २३) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
 
पोलिस सूत्रानुसार, सहा ऑगस्ट रोजी आई-वडील घरी नसल्याने दोन्ही मैत्रिणी घराच्या अंगणात खेळत होत्या. दरम्यान, छोटू तिथे आला आणि दोघींनाही घरातील बेडरूममध्ये घेऊन गेला. यावेळी त्याने दोघींशीही अश्लील कृत्य करीत त्यांच्यावर अत्याचार केला. शिवाय हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे या दोन्ही अल्पवयीन पीडिता घाबरल्या होत्या. अखेर त्यांनी हिंमत करून हा प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला. 

माहिती होताच या दोन्ही प्रकाराची तक्रार रामनगर पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा
 

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची ही दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. शनिवारी आईच्या कुशीत झोपून असलेल्या चिमुकलीला उचलून नेत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रकार घडला. जिल्ह्यात अशा घटना घडत असून पोलिसांनी यावर आळा घालण्याची मागणी होत आहे. 

 

पोलिसांसमोर आव्हान

वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस विभागासमोर आव्हान उभे ठाकले असून, महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. चोरी, खून यांसारख्या घटनांसोबतच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  

 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obscene acts with two girls who are playing in yard