अरे वा! लग्न लागले मात्र, मंगलाष्टकात नव्हे तर राष्ट्रगीताने

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे राजेश खारोडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र सुरज खारोडे यांच्या आई-वडिलांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत हा विविह पूर्णत्वाकडे नेला. लग्नाला लागणारा खर्च वाचवून तो हे दोन्ही कुटुंब दिव्यांग बांधवांच्या कल्याणार्थ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तेल्हारा (जि. अकोला) : तेल्हारा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे राजेश खारोडे यांच्या ज्येष्ठ मुलाचा आदर्श विवाह गुरुवारी (ता.17) पार पडला. दरम्यान, राष्ट्रगीताच्या साक्षीने हा विवाह करीत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक नवा आदर्श पुढे आल्याचे दिसून येत आहे. मुला-मुलीचे वडील, वधू-वर अशा एकंदरीत पाच लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत म्हणून हा विवाह आनंदाने पार पडला.

क्लिक करा- ... तर पिक कर्जावर व्याज आकारणी नाही!

लग्नाचा खर्च दिव्यांग बांधवांच्या कल्याणार्थ
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बबनराव टेकाळे यांची ज्येष्ठ कन्या पल्लवी तर अकोला जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे राजेश खारोडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र सुरज खारोडे यांच्या आई-वडिलांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत हा विविह पूर्णत्वाकडे नेला. लग्नाला लागणारा खर्च वाचवून तो हे दोन्ही कुटुंब दिव्यांग बांधवांच्या कल्याणार्थ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh my god The marriage started, however, not in Mangalashtak but in the national anthem