esakal | दीड कोटीच्या दारूसाठ्यावर रोडरोलर, न्यायालयाच्या मंजुरीनंतर चिमूर पोलिसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

one and half crore liquor stock destroyed by chimur police in chandrapur

जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री व वाहतुकीस ऊत आला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी चिमूर पोलिसांनी अनेक कारवाया करीत कोट्यवधींचा दारूसाठा जप्त केला आहे.

दीड कोटीच्या दारूसाठ्यावर रोडरोलर, न्यायालयाच्या मंजुरीनंतर चिमूर पोलिसांची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिमूर (जि. चंद्रपूर) : चिमूर पोलिस ठाणेअंतर्गत 2015 ते 2019 या कालावधीत विविध गुन्ह्यांत दारूसाठा जप्त करण्यात आला होता. त्यापैकी न्यायालयाने दारूसाठा नष्ट करण्याकरिता मंजुरी दिलेल्या 467 गुन्ह्यांतील 1 कोटी 34 लाख 54 हजार 580 रुपयाच्या दारूसाठ्यावर तिरखुरा मार्गावर रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आला.

हेही वाचा - ‘राज्य सरकारने दोन दिवसांचे म्हणत सात दिवसांचे लॅाकडाउन लादून फसवणूक केली’

जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री व वाहतुकीस ऊत आला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी चिमूर पोलिसांनी अनेक कारवाया करीत कोट्यवधींचा दारूसाठा जप्त केला आहे. 2015 ते 2019 या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यातील 467 गुन्ह्यातील जप्त अवैध दारूसाठा नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात आली होती. सदर गुन्ह्यातील 1 कोटी 34 लाख 54 हजार 580 रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा तथा चिमूर पोलिसांना न्यायालयाने मंजुरी दिली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा येथील दुय्यम निरीक्षक अ. अ. तोंडे, सहायक निरीक्षक चंदन भगत, किशोर पेदुजवार, दिलदार रायपुरे यांच्या निरीक्षणात पंचासमक्ष मालखान्यातून मोहरील अंबादास देवतडे यांनी मजुरांकडून ट्रॅक्‍टर तथा पिकअप वाहनात दारूसाठा भरून तिरखुरा रस्त्यावर आणून पसरला. त्यानंतर रोडरोलर चालवून दारूसाठा नष्ट करण्यात आला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत चालली. पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोळ, उपपोलिस निरीक्षक अलिम शेख, राजू गायकवाड, कैलास अलाम उपस्थित होते. 
 

loading image